Breaking News

सोलापूर : पोलीस उपायुक्त वैशाली कडुकर यांच्याकडून सोलापूरकरांना आवाहन ; या सुचनेचे काटेकोरपणे पालन करा

 सोलापूर : पोलीस उपायुक्त वैशाली कडुकर यांच्याकडून सोलापूरकरांना आवाहन ; या सुचनेचे काटेकोरपणे पालन करा

सोलापूर : सोलापूर शहरात वाढत्या घरफोड्या जबरी चोरी यासह चैनस्नाचिंग या घटनांच्या पार्श्वभूमीवर सोलापूर पोलिस आयुक्तालयाच्या वतीने उपायुक्त वैशाली कडूकर यांनी एक पत्र काढून प्रसार माध्यमांच्या मार्फत सोलापूरकरांना आवाहन केले आहे.


१. नागरिकांनी घर बंद करुन बाहेरगांवी जाते वेळी शेजाऱ्यांना त्याची माहिती दयावी

२. नागरिकांनी बाहेर गांवी जाताना ते कोठे व किती दिवस बाहेरगांवी जाणार आहेत याची माहिती जवळच्या पोलीस ठाणे / चौकीस दयावी.

३. नागरिकांनी शक्य असल्यास आपले घराचे समोरील भागात सीसीटिव्ही कॅमेरे बसवावेत.

४. नागरिकांनी मौल्यवान वस्तु व रक्कम सुरक्षितपणे बँकेच्या लॉकरमध्येच ठेवावव्यात.


५. नागरिकांनी शक्य असल्यास आपले कॉलनीत / वसाहत / सोसायटी / परिसरात रात्रीच्या वेळी वॉचमेनची नियुक्ती करावी.

६. नागरिकांनी त्यांचे मुख्य लाकडी दरवाजाचे सुरक्षिततेसाठी सेप्टी डोअर / लोखंडी दरवाजा बसवून घ्यावा.

७. नागरिकांनी दिवसा रात्री कोणी संशयीत व्यक्ती त्यांचे परिसरात फिरत असताना दिसून आल्यास तत्काळ त्याची माहिती नजीकच्या पोलीस ठाणे/ चोकी/ नियंत्रण कक्ष येथे कळवावी.


८. नागरिकांनी मौल्यवान दागीने बाहेरगांवी जाताना ते सुरक्षितपणे ठेवण्याची अगर घेवून जाण्याची व्यवस्था करावी.

९. महिलांनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना त्यांचे दागीणे चोरटया कडुन ओढले खेचले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी.

Post a Comment

0 Comments