देशातील पहिलीच घटना! सोलापुरात फरगेट पासवर्डचा वापर; खात्यातील पाऊण लाख रुपये काढले
एखादा चोरटा चोरी करण्यासाठी कोणती शक्कल लढवेल सांगता येत नाही. आता हेच पहा ना, फरगेट पासवर्डचा वापर करून खात्यातील पाऊण लाख रुपये काढून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला. सोलापुरातील जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, कदाचित ही घटना देशातील पहिलीच असू शकते असे सांगण्यात येते. याबाबतचे वृत्त असे की, बुधवार पेठेतील श्राविका शाळेसमोर राहणाऱ्या संजीवकुमार व्यास हे व्यापारी भाजी आणण्याकरिता कस्तुरबा मंडईत गेले होते.
त्यावेळी त्यांचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल गहाळ झाला. याबाबत त्यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात देशातील गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्यांनी स्वतःचे बँक खाते असलेल्या इंडसइड बँकेमधून सेव्हिंग्ज अकाउंटचे स्टेटमेंट काढले असता त्यांच्या खात्यातून ७८ हजार रुपये काढण्यात आल्याचे दिसून आले .याबाबत त्यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता ही रक्कम त्यांच्या गुगल पेजद्वारे खर्च करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.

0 Comments