म्हैशाळ योजना कालव्याच्या बंदिस्त पाईपलाईन कामाच्या २५ कोटी ८७ लाखांची निविदा प्रसिद्ध -आमदार शहाजीबापू पाटील
सांगोला /प्रतिनिधी सांगोला तालुक्यातील अपूर्ण असणाऱ्या शेतीच्या पाण्याच्या योजना पूर्ण करण्यासाठी आमदार शहाजीबापू पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे शेतीच्या पाण्याच्या योजना मार्गी लागताना दिसत आहेत
सांगोला तालुक्यांमध्ये महैशाळ योजना कालव्याचे बंदिस्त पाईपलाईनचे अपूर्ण असणारे कामे अनेक वर्षापासून प्रलंबित होते कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्प अंतर्गत म्हैशाळ उपसा सिंचन योजना जत भाग सांगोला वितरिका क्रमांक १ व क्रमांक २ वरील वितरण व्यवस्थेवर बंदिस्त नलिकेद्वारे लाभक्षेत्राची विकासाची कामे करणे ५ वर्षे कालावधीसाठी देखभाल-दुरुस्ती व यशस्वी परिचलन करणे या कामांसाठी आमदार शहाजीबापू पाटील यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून २५ कोटी ८७ लाख निधी मंजूर करून घेतला आहे या कामांची निविदा प्रसिद्ध झाली असून लवकरच कामे ही निविदा प्रक्रिया पूर्ण करून सुरु केली जातील
या कामांमुळे सांगोला तालुक्यातील डिकसळ,सोनंद, पारे, नराळे, हंगिरंगे,घेरडी हबीसेवाडी, गावडेवाडी,गावातील शेतीच्या पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न मिटणार असल्याने तेथील शेतकरी आनंद व्यक्त करीत आहेत.२०१९ विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार शहाजीबापू पाटील यांनी मतदारांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करीत असल्याने सांगोला तालुक्यातील नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत
यावेळी बोलताना आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले की यापुढेही सांगोला मतदार संघाच्या विविध विकास कामांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून भरघोस निधी उपलब्ध केला जाईल

0 Comments