सह्याद्री प्रतिष्ठानच्यावतीने मंगळवेढा मधील ऐतिहासिक पुरातन बारव स्वच्छता मोहीम संपन्न
सांगोला (प्रतिनिधी): सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तान सोलापूर जिल्हा विभागाच्या वतीने मंगळवेढा येथील महादेव मंदिरा लगत असलेली पुरातन बारव ची स्वच्छता सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली. मोहिमेची सुरुवात दुर्गसेवकांच्या हस्ते बारवचे पूजन करून करण्यात आली. सदर बारव पुरातन असून बारवमध्ये अनेक लहान मंदिर आहे परंतु ही बारव खूप अस्वच्छ असून काही भागाची पडझड हि झालेली होती. यासाठी मंगळवेढा नगरपरिषद मुख्याधिकारी श्री.निशिकांत प्रचंडराव साहेब यांची परवानगी घेऊन प्रतिष्ठानच्या वतीने मोहिमेचे आयोजन केले होते. बारव मधील माती, प्लास्टिक, काटेरी झाडेझुडपे, पालापाचोळा तसेच इतर कचरा पूर्णपणे काढण्यात आला व बारव कडे जाणारा पायरी मार्ग मोकळा करण्यात आला.
सदर मोहीम सह्याद्री प्रतिष्ठान सोलापूर जिल्हा अध्यक्ष श्री. आशिष पताळे-पाटील व जिल्हा प्रशासक श्री.अविनाश पोफळे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. या मोहिमेस सह्याद्री प्रतिष्ठान सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, पंढरपूर, दक्षिण सोलापूर, मंगळवेढा असे विविध तालुका विभागतील 30 पेक्षा जास्त दुर्गसेवक उपस्थित होते. या मोहिमेस नगरपरिषद मंगळवेढा चे मुख्याधिकारी श्री.निशिकांत प्रचंडराव साहेब, नगरपरिषदेचे कर्मचारी, ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले. श्री.प्रवीण म्हेत्रे, श्री सुदर्शन यादव व नगरपरिषद मंगळवेढा यांच्यावतीने मोहिमेस अल्पोपहार दिला. उपस्थित सर्वांचे आभार मानून मोहिमेची सांगता करण्यात आली.

0 Comments