लायसन काढण्यासाठी आता आरटीओ चाचणीची गरज नाही
गाडी चालवणा - या प्रत्येक व्यक्तीसाठी केंद्र सरकारने वाहतुकीचे काही नियम बनवले आहेत . प्रत्येकाकडे लायनस असणे गरजेचे आहे . आता वाहतुकीचे नियमात सरकारने मोठ्या प्रमाणावर बदल केला असून , दंडही बदलला आहे . त्यामुळे जर लायसन नसले तरी लोक गाडी चालवत असतात .
तसेच अनेक वेळा लोकांना लायसन काढतानाचे किचकट नियम , प्रक्रिया आदींमुळे लायसन काढता येत नाही . पत्त्याचे पुरावे नसले तर काही वेळा लायसन काढतानाची चाचणी करावी लागते . परंतु आता यापुढे लायसन काढण्यासाठी आरटीओत जाऊन चाचणी द्यायची गरज राहणार नाही . कारण चाचणी न देताच लायसन मिळणार आहे . याकरीता केंद्र सरकारने ड्रायव्हिंग लायसन बनविण्याच्या नियमांमध्ये बदल केला आहे .
ड्रायव्हिंग लायसन्सच्या नियमांमध्ये केलेल्या
बदलांनुसार , आता तुम्हाला आरटीओमध्ये जाऊन कोणत्याही प्रकारची ड्रायव्हिंग टेस्ट देण्याची गरज नाही , असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने अधिसूचित केलेले नियम आहेत . यामुळे आता तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्ससाठी आरटीओच्या वेटिंग लिस्टमध्ये अडकून राहण्याची गरज नाही .
तुम्ही कोणत्याही मान्यताप्राप्त ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलमध्ये ड्रायव्हिंग लायसन्ससाठी स्वतःची नोंदणी करू शकता . नोंदणी केलेल्या ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलमधून प्रशिक्षण घ्यावे लागेल आणि तेथेच चाचणी उत्तीर्ण करावी लागेल . तर त्या अर्जदारांना त्या स्कूलकडून प्रमाणपत्र दिले जाणार आहे . या प्रमाणपत्राच्या आधारे अर्जदाराचा ड्रायव्हिंग लायसन्स जारी केला जाईल .
0 Comments