google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 अनैतीक संबंधातून आई उठली मुलाच्या जिवावर!- प्रियकराच्या संगनमताने लटकवते त्याला फासावर

Breaking News

अनैतीक संबंधातून आई उठली मुलाच्या जिवावर!- प्रियकराच्या संगनमताने लटकवते त्याला फासावर

 अनैतीक संबंधातून आई उठली मुलाच्या जिवावर!- प्रियकराच्या संगनमताने लटकवते त्याला फासावर


 मंगलाबाई विलास पाटील ही चहाचे दुकान चालवत होती. तिच्या दुकानावर चहा पिण्यासाठी विविध प्रकारचे ग्राहक येत होते. 



तिच्या दुकानाजवळच एक साडीचे दुकान होते. त्या साडी विक्रेत्याकडे प्रमोद जयदेव शिंपी हा कामाला होता. चहा पिण्यासाठी प्रमोदचे मंगलाबाईकडे नेहमी येणे जाणे होते. तिच्या चहापेक्षा त्याला ती आवडत होती. बघता बघता दोघांचे प्रेम जुळण्यास वेळ लागला नाही. दोघांचे  एकमेकांवर प्रेम बसले. बघता बघता दोघांनी प्रेमप्रकरणात लवकरच मोठी हद्द पार केली. 


दोघांचे  प्रेम अनैतीक संबंधात बदलण्यास वेळ लागला नाही. वास्तविक मंगलाबाई एक विवाहीता होती. तिला प्रशांत नावाचा एकुलता एक मुलगा तसेच एक मुलगी असे दोन अपत्य होते. पती व दोन मुलांचा सुखी संसार सुरु असतांना ती प्रमोदच्या नादी लागली आणि वाहवत गेली.


एरंडोल तालुक्यातील विखरण येथे येथे प्रमोद शिंपी रहात होता. तेथेच त्याची शेती होती. मंगलाबाई आपल्या पती व मुलासह जळगावच्या सावखेडा शिवारातील जलाराम नगरात रहात होती. प्रमोदच्या प्रेमात मंगलाबाई बहकली होती. 


तिला पती विलास पाटील पेक्षा प्रियकर प्रमोद शिंपी जवळचा वाटत होता. त्यामुळे ती प्रमोदला भेटण्यासाठी त्याच्या शेतात जात होती. आपली आई कामावर जाण्याऐवजी प्रमोदला भेटण्यासाठी विखरण येथे जात असल्याचे तिचा एकुलता मुलगा प्रशांत यास समजत होते. प्रशांत हा चौदा वर्षाचा बालक होता. 


आपली  आई मंगलाबाईचे विखरण येथील प्रमोदसोबत असलेले प्रेमसंबंध त्याला समजत होते. एके दिवशी तो आईसोबत प्रमोदच्या शेतात गेला. त्यावेळी प्रमोदचे त्याच्या आईसोबत सुरु असलेले फाजील चाळे त्याने पाहिले. त्यामुळे त्याला प्रमोदबद्दल घृणा निर्माण झाली. तिने प्रमोदसोबत संबंध ठेवू नये असे त्याच्या बालमनाला वाटत होते. 


ते स्वाभाविक होते. आपल्या मुलाने प्रमोदसोबतचे संबंध  बघू नये म्हणून ती मुलाला घरी सोडून एकटीच प्रमोदच्या शेतात जावू लागली. मुलगा सोबत नसला म्हणजे तिला मुक्तपणे प्रमोदसोबत प्रेमाचे रंगीले चाळे करण्यास रान मोकळे मिळत होते.  आपली आई नक्कीच प्रमोदसोबत चाळे करत असणार याची प्रशांतच्या बालमनाला चाहुल लागत होती.


 त्यामुळे तो तिला वारंवार फोन करुन घरी केव्हा येणार याची विचारणा करुन हैरान करुन सोडत होता. जिथे असेल तेथून व्हिडीओ कॉल कर असा तो तिला आग्रह करु लागला होता. मी घरी पप्पांना सर्व काही सांगेन असे म्हणत तो तिच्याशी वाद घालत होता. प्रशांतच्या माध्यमातून आपले व प्रमोदचे  अनैतीक संबंध उघड होणार अशी भिती मंगलाबाईला सतावू लागली.

Post a Comment

0 Comments