google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 आज रविवारी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम पोलिओचे मुळापासून उच्चाटन करा, मुलांना पोलिओचे डोस पाजा.

Breaking News

आज रविवारी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम पोलिओचे मुळापासून उच्चाटन करा, मुलांना पोलिओचे डोस पाजा.

 आज रविवारी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम पोलिओचे मुळापासून उच्चाटन करा, मुलांना पोलिओचे डोस पाजा.



सांगोला (प्रतिनिधी): पल्स पोलीओ लसीकरण मोहिमेंतर्गत 0 ते 5 वर्षे वयोगटातील जिल्ह्यातील सर्व बालकांना उद्या रविवार दिनांक 27 फेब्रुवारी 2022 रोजी जिल्ह्यातील 3002 केंद्रावर लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव यांनी दिली.


ही मोहिम जिल्हाधिकारी व जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणार असून ग्रामीण विभागासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी, नागरी भागासाठी जिल्हा शल्यचिकित्सक, व महानगरपालीका क्षेत्रासाठी आरोग्याधिकारी यांच्यामार्फत राबविली जाणार आहे. आपल्या जिल्हयातील ५ वर्षाच्या आतील एकही बालक पोलिओ लसीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता प्रत्येक स्तरावर घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


प्रवास करणाऱ्या बालकांना लस देण्यासाठी एस. टी. स्टॅन्ड, रेल्वे स्टेशन, मंदिरे, विटभट्टया, ऊस तोड चालू असलेली ठिकाणे येथे लसीकरण केंद्रे उघडण्यात येणार आहेत. पोलिओ लसीकरणापासून वंचित राहणाऱ्या बालकांना रविवार नंतर 3 दिवस घरोघरी जावून पोलिओ लस दिली जाणार आहे.

Post a Comment

0 Comments