google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 शाळकरी मुलावर अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील 'त्या' शिक्षकाला सुनावली न्यायालयीन कोठडी

Breaking News

शाळकरी मुलावर अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील 'त्या' शिक्षकाला सुनावली न्यायालयीन कोठडी

 शाळकरी मुलावर अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील 'त्या' शिक्षकाला सुनावली न्यायालयीन कोठडी



नात्यातील शाळकरी मुलास निमित्ताने घरी बोलावून त्याच्यासोबत जबरदस्तीने अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी पोलिस कोठडीत असलेल्या प्रा.हारून मुल्ला यास पंढरपूर येथील न्यायालयात हजर केले असता अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश कमला बोरा यांनी त्याला १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.


याबाबत सविस्तर माहिती अशी, यातील पीडित मुलगा हा सन २०१३ ते २०१७ या कालावधीत महाविद्यालयीन शिक्षणासाठी मंगळवेढा येथे खोली करून राहात होता.


पीडित मुलगा त्याच्या शाळेनंतर शिकवणीसाठी नातेवाईक असलेल्या प्राध्यापकाच्या घरी गेल्यानंतर त्याच्यासोबत जबरदस्तीने अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवल्यामुळे सन २०१७ नंतर मुलगा वेड्यासारखे वागू लागला.


पीडित मुलाचे वडील त्याला मानसोपचार तज्ज्ञाकडे उपचारासाठी घेऊन गेल्यानंतर याचा खुलासा झाला. त्यानंतर संशयित आरोपी प्राध्यापकाच्या विरोधात मंगळवेढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.


त्याला अटक झाली होती. यापूर्वी न्यायालयाने बुधवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. ती संपल्यामुळे पंढरपूर येथील न्यायालयात पोलिसांनी हजर केले असता पुन्हा एकदा पोलिस कोठडीची मागणी केली.


या आरोपीने आणखी काही गुन्हा केला आहे का, तपासण्यासाठी पोलिस कोठडीची मागणी केली होती. यावर युक्तिवाद करताना आरोपीचे वकील धनंजय हजारे यांनी आतापर्यंत पोलिस कोठडीत पोलिसांनी तपास केला नाही.


त्यामुळे आता त्याच कारणासाठी पुन्हा पोलिस कोठडीची मागणी करणे योग्य नाही, असा केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायाधीशांनी संशयित आरोपीस १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक सौरभ शेटे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments