google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील कलावंतांच्या प्रमुख उपस्थितीत लावणी व खंडोबा गीताच्या पोस्टर अनावरणाचा कार्यक्रम हाँटेल विसावा येथे संपन्न

Breaking News

सांगोला तालुक्यातील कलावंतांच्या प्रमुख उपस्थितीत लावणी व खंडोबा गीताच्या पोस्टर अनावरणाचा कार्यक्रम हाँटेल विसावा येथे संपन्न

 सांगोला तालुक्यातील कलावंतांच्या प्रमुख उपस्थितीत लावणी व खंडोबा गीताच्या पोस्टर अनावरणाचा कार्यक्रम हाँटेल विसावा येथे संपन्न


सांगोला तालुका/ प्रतिनिधी ; आज रविवार दि.२७ फेब्रुवारी रोजी सांगोला शहरातील महुद रोडवरील " हाँटेल विसावा " या ठिकाणी सांगोला तालुक्यातील लोककलावंताच्या प्रमुख उपस्थितीत लावणी व खंडोबाचे गितांच्या पोस्टर चे अनावर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.



या वेळी " लाज मला हो आली " या लावणीच्या गाण्याच्या पोस्टरचे , " जानु जागरण घालुया औंदा " व " खंडेराया लाड लाड येना " आणि " चला जावूया जेजुरीला " या खंडोबाच्या गाण्याच्या पोस्टरचे अनावर कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित असणाऱ्या सर्व प्रमुख पाहुण्यांचा  सत्कार करण्यात आला . तसेच या कार्यक्रमासाठी " हाँटेल विसावा " चे मालक प्रशांत राजमाने यांनी योगदान दिले बद्दल त्यांचाही सत्कार आयोजकाकडून करण्यात आला.


या कार्यक्रम प्रसंगी  शाहीर सुभाष गोरे , सुधाकर वाघमोडे , भागवत करे , सत्वावान निर्मळ वाघमारे, गणेश करे , सोमनाथ जगधने , सोमनाथ गोरे , दत्ता चंदनशिवे , आण्णा इंगोले , सोनाली चव्हाण , वनिता भोसले ,  शिवाजीराव डुबल सर , प्रेमकुमार वाघमारे  , पांडुरंग जाधव , भिवा भोसले , आप्पाराव भोसले , काशिनाथ गेजगे , विकी गोरे , गिरीधर इंगोले , मोहसीन शेख  इत्यादी कलावंत उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments