सांगोला तालुका बहुउद्देशीय पत्रकार संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर
सांगोला (प्रतिनिधी): सांगोला तालुक्यातील पत्रकारितेची सक्षमपणे धुरा सांभाळणाऱ्या बहुउद्देशीय पत्रकार संघटना सांगोला या संघटनेच्या नूतन पदाधिकारी कार्यकारिणीच्या निवडी आज बुधवार दि. 23 फेब्रुवारी रोजी मार्गदर्शक हमीदभाई इनामदार व नागेश जोशी यांच्या प्रमुख उपस्थित पार पडल्या. यामध्ये बहुद्देशीय पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी सचिन भुसे, उपाध्यक्षपदी हमीद बागवान, सचिव पदी रोहीत सोनवणे, खजिनदारपदी आनंद उर्फ छोटू दौंडे यांच्या सर्वानुमते निवडी करण्यात आल्या.
सांगोला तालुका बहुउद्देशीय पत्रकार संघटनेचे मार्गदर्शक तथा माजी अध्यक्ष हमीदभाई इनामदार, नागेश जोशी, ज्येष्ठ पत्रकार एम. एम. पठाण सर यांनी संघटनेच्या सुरुवातीपासून दैनिक, साप्ताहिक व यूट्यूब चैनल च्या प्रतिनिधींना एकत्रित करून संघटनेच्या बळकटीकरण यासंदर्भात योग्य निर्णय घेतले आहेत. त्याचबरोबर पत्रकार दिन, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन यासह इतर सण आणि उत्सवाच्या निमित्ताने संघटनेच्यावतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून यामध्ये प्रामुख्याने वृक्ष लागवड, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप,
रुग्णांना फळे आणि अल्पोपहार वाटप यासह पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले आहेत. यामध्ये माजी अध्यक्ष- उपाध्यक्ष व सचिव तसेच सर्व सदस्यांनी यापूर्वीच्या काळात उत्तम रित्या संघटनेच्या कार्याची धुरा सांभाळली आहे. या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी अत्यंत चोखपणे पार पाडून संघटनेला शिस्तबद्ध दिशा दिली आहे. त्यानंतर आता संघटनेची नव्याने कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.
सदर निवडीवेळी नूतन पदाधिकाऱ्यांना माजी अध्यक्ष हमीदभाई इनामदार यांनी पदांच्या जबाबदाऱ्या व अधिकार सांगून नूतन पदाधिकाऱ्यांना भावीकार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी पत्रकार हमीदभाई इनामदार, नागेश जोशी, भारत कदम, सुरज लवटे, किशोर म्हमाणे, सुरेश गंभीरे, महादेव पारसे, यांसह पत्रकार संघटनेच्या इतर सदस्य उपस्थित होते.
0 Comments