दहावी बारावी पूणे बोर्डाच्या प्रश्प्रत्रिका जळून खाक
तालुक्यातील पुणे- नाशिक महामार्गावर दहावी बारावीच्या पुणे बोर्डाच्या प्रश्नपत्रिका घेऊन जाणाऱ्या आयशर टेम्पोला चंदनापुरी घाटात अचानक मागच्या बाजूने आग लागली. या आगीमध्ये संपूर्ण प्रश्नपत्रिका जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनास्थळी पोलीस अग्निशामक दल दाखल होत टेम्पो विझवण्यात आला. मात्र तोपर्यंत टेम्पो संपूर्ण जळून खाक झाला होता.”
घटनेमध्ये जीवित हानी झाली नसली, तरी टेम्पो संपूर्ण जळून खाक झाला असून त्यामधील सर्व दहावी– बारावीच्या प्रश्नपत्रिका जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पुणे बोर्डाचे अधिकारी घटनास्थळी आल्यानंतरच पंचनामा करू अशी माहिती संगमनेर पोलिसांनी दिली आहे.
0 Comments