google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 विज्ञान महाविद्यालयामध्ये संत गाडगे महाराज यांना अभिवादन.

Breaking News

विज्ञान महाविद्यालयामध्ये संत गाडगे महाराज यांना अभिवादन.

विज्ञान महाविद्यालयामध्ये  संत गाडगे महाराज यांना अभिवादन.

          महाराष्ट्रामध्ये अनेक समाजसुधारक होऊन गेले. परंतु संत गाडगेबाबा यांच्यासारखा समाजसुधारक आणि परिवर्तनवादी समाज सुधारक होणे नाही. साधे राहणीमान ,उच्च विचार ,सामाजिक न्याय, बंधुता , याचा विचार आत्मसात करून समाजातील तळागाळापर्यंत पोहोचवणारे संत गाडगेबाबा हे महाराष्ट्रातील एक थोर समाज सुधारक होय . संत गाडगे महाराज हे चालते फिरते एक शिक्षक होते. पायात तुटकी चप्पल, डोक्यावर फुटके गाडगे, अशी वेशभूषा करून प्रत्येक गावांमध्ये जाऊन गाव स्वच्छ करणे व गावातील लोकांची मन स्वच्छ करणे हे याचं मोठं कार्य संत गाडगे महाराज यांनी केले. 



त्यांनी सामाजिक प्रबोधनातून अनिष्ट व विकृत प्रथा नष्ट करण्याचा किर्तनातून प्रयत्न केला. देवाला कोंबडे बकरे कापू नका, पैशाचा गैरवापर करू नका. यासारखे समाज सुधारक विचार त्यांनी लोकांपर्यंत जाऊन पोहोचवले गावागावांमध्ये धर्मशाळा, रुग्णालय, जनावरासाठी गोशाळा, दारूबंदी वर्णभेद संपवण्यासाठी कीर्तनातून परिवर्तनवादी विचार पोहोचवले. अशा थोर संताला  आज त्यांच्या जन्मदिवशी विनम्र अभिवादन असे उद्गार विज्ञान महाविद्यालयामध्ये संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी


 करताना महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. रघुनाथ फुले यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला प्रमुख पाहुणे सांगोला महाविद्यालयातील मराठी विभागातील विभाग प्रमुख प्रा. डॉ. बबन गायकवाड, समितीचे चेअरमन प्रा. डॉ. दीपक रिटे, प्रा. डॉ. किसन माने यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. व त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.


             कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सांगोला महाविद्यालयातील मराठी विभागाचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. बबन गायकवाड यांनी संत गाडगे महाराज यांच्या जीवन चरित्राची ओळख करून देऊन त्यांनी स्वच्छतेबरोबर माणसांचे मनही कसे स्वच्छ केली हे स्पष्ट केले. आज समाजामध्ये माणसांचे मन स्वच्छ करणे किती महत्त्वाचे आहे हे स्पष्ट करून संत गाडगेबाबा यांचे जीवन चरित्र व त्यांचे कार्य विद्यार्थ्यांना प्रेरक व मार्गदर्शक असल्याचे सांगितले. 


त्यांच्या जयंतीनिमित्त आज आपण त्यांच्या कार्याला वंदन करूया व त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन समाजामध्ये बदल घडवूया असा आशावाद विद्यार्थ्यांसमोर त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. डॉ. दिपक रिटे यांनी केले आभार प्रा. डॉ. किसन माने यांनी मानले कार्यक्रमाला विद्यार्थी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments