google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 Solapur : रेल्वे स्थानकावर बापाचा चिमुरडीवर बलात्कार करून खून , आईचाही हात ; दोघांना बेड्या

Breaking News

Solapur : रेल्वे स्थानकावर बापाचा चिमुरडीवर बलात्कार करून खून , आईचाही हात ; दोघांना बेड्या

 Solapur : रेल्वे स्थानकावर बापाचा चिमुरडीवर बलात्कार करून खून , आईचाही हात ; दोघांना बेड्या

सोलापूर: बाप-मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे.सोलापूर लोहमार्ग पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. सिकंदराबाद येथे मोलमजुरीसाठी गेलेल्या एका मजुराने आपल्याच सोळा महिन्याच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे.



 त्यानंतर गळा आवळून खून केला आहे. पुरावा नष्ट करण्यासाठी सोळा महिन्याच्या मुलीचं मृतदेह घेऊन जात असताना, सोलापूर लोहमार्ग पोलिसांनी संशयीत आरोपी आणि त्यासोबत त्याच्या पत्नीला देखील ताब्यात घेतले आहे.



लोहमार्ग सहायक पोलीस निरीक्षक अमोल सुभाष गवळी यांनी फिर्याद दिली आहे, फिर्यादीनुसार 3 जानेवारी रोजी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास आपल्या सोळा महिन्याच्या मुलीवर वडीलाने राहते घरी अनैसर्गीक पध्दतीने लैगीक अत्याचार केला.



 आणि त्यांनतर तिचा गळादाबून ठार मारुन पुरावा नष्ट करण्याच्या प्रयत्न केला. लोहमार्ग पोलिसांनी लैंगिक अत्याचार अधिनियम कलम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हा गुन्हा आता हैदराबाद पोलिसांकडे वर्ग केला जाणार असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक गणेश शिंदे यांनी दिली.


मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मूळ गावाकडे निघाले होते;



संशयीत आरोपी हा पत्नी सोबत संगणमत करुन त्याची मृत मुलीच मृतदेह घेऊन मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्यांचे मुळगावी राजस्थान येथे सिकंदराबाद राजकोट या रेल्वेने घेवून जात होता. सदर गुन्हयाच्या प्रकारात त्याची पत्नी आरोपीचा बचाव करण्याच्या उद्देशाने तो गुन्हा दडवून ठेवून मयत मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी रेल्वेने घेवून जात होते.



 लोहमार्ग पोलिसांनी पती पत्नीला अटक केले आहे. सदरचा गुन्हा हा केसरा पोलीस ठाणे जिल्हा रंगारेडडी येथे घडलेला आहे. सदरचे कागदपत्रासह संशयीत आरोपी हैद्राबाद वर्ग करीत आहोत.

Post a Comment

0 Comments