राज्यात सरकारने वाहनचालकांवर लावले कडक निर्बंध
राज्यात 20 डिसेंबरपासून सातत्याने कोरोना बाधित रुग्णांत वाढ होताना दिसत आहे. तसेच ही तिसरी लाट असून सध्या ती प्राथमिक अवस्थेत असल्याचे मानले जात आहे. ओमायक्रॉन विषाणूची जगभर दिसून आलेली
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून गेल्या काही दिवसांपासून शहरात विनामास्क फिरणाऱ्या वाहनचालकांचे फोटो काढून त्यांच्यावर कारवाईचा करण्यात येणार आहे.आतापर्यंत 1875 वाहने ब्लॅकलिस्ट करण्यात आली आहेत.
राज्यामध्ये 100 टक्के लॉकडाऊन करण्याची आवश्यकता नाही आहे. गर्दी रोखण्यासाठी निर्बंध आणावे लागणार आहेत. लगेच निर्बंध लावण्यात येणार नाहीत परंतु आढावा घेऊन ठरवण्यात येईल. दुचाकी-चारचाकीतुन विनामास्क फिरला असाल तर सावधान राहा
कारण यात विनामास्क वाहनधारकांविरुद्ध महापालिकेच्या पथकाकडून फोटो काढण्यात येत आहेत. ते फोटो आरटीओ कार्यालयाच्या मेल आयडी वर पाठवले जात आहेत.आरटीओ कार्यालयाने विनामास्क फिरणाऱ्या 1875 चालकांचे वाहन ब्लॅकलिस्ट केले आहे.
राज्यातील वाहनांचे नियम कडक करण्यात आले असून सरकारने यावर देखील निर्बंध लावले आहेत. त्यानंतर वाहन चालकांना ई-चलन पाठवण्यात आले. ई-चलान पाठवण्यात आलेल्या वाहनाच्या दंडाची रक्कम त्वरित भरली तर त्यांचे वाहन ब्लॅकलिस्टमध्ये जाणार नाही. दंड भरला नाही तर वाहनधारकांना टॅक्स, पीयूसी, इन्शुरन्स, फिटनेस करता येणार नाही. एवढेच नव्हे तर वाहन मालकाला वाहन विक्री करता येणार नाही.
0 Comments