Dolo 650 | ताप , डोकेदुखी , अंगदुखीवर एका झटक्यात आराम ! कोरोना काळात गोळी अडीच रुपयांच्या डोलो गोळीने केली 567 कोटींची कमाई
ताप आला, डोके दुखले किंवा अंग दुखायला लागले तर आपण सरळ मेडिकलमध्ये जाता आणि पॅरासिटोमोलची गोळी घेता ना? कोरोना महामारीच्या काळात तर लस टोचली की, तीच गोळी दिली जायची.साहजिक त्याचा खप जास्त असला पाहिजे हो ना? पण, तुम्ही चुकीचे आहात. कारण, मार्च 2020 पासून डोलो 650 नावाच्या गोळीची प्रचंड प्रमाणात विक्री झाली आहे. तब्बल 567 कोटींची विक्री झाली आहे
दिल्ली : ताप आला, डोके दुखले किंवा अंग दुखायला लागले तर आपण सरळ मेडिकलमध्ये जाता आणि पॅरासिटोमोलची गोळी घेता ना? कोरोना महामारीच्या काळात तर लस टोचली की, तीच गोळी दिली जायची. साहजिक त्याचा खप जास्त असला पाहिजे हो ना? पण, तुम्ही चुकीचे आहात. कारण, मार्च 2020 पासून डोलो 650 नावाच्या गोळीची प्रचंड प्रमाणात विक्री झाली आहे. तब्बल 567 कोटींची विक्री झाली आहे
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत जेव्हा आपण होतो, जो-तो हीच गोळी खात होता. त्यामुळे भारतीयांचा 'आवडता स्नॅक' या गोळीला म्हटले जात आहे. सोशल मीडियावर त्यासंदर्भात ट्रेंड सुरू झाला, मोठ्या प्रमाणात मिम्स बनविण्यात आले.
इतर गोळ्यांच्या तुलनेत डोलो 650 सर्वांचा भारी पडली आहे. विक्रीचा आलेखा काढला तर त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर डोलो 650 आहे. त्यानंतर कॅलपॉल आणि सुमो एल या गोळ्यांचा दुसऱ्या क्रमांकावर लागतो. आपल्या देशात तब्बल 37 'पॅरासिटोमोलचे ब्रॅण्ड' विक्री करतात. तर पॅरासिटोमोलमध्ये डोलो 650 आणि कॅलपॉल या गोळ्या विक्रीमध्ये आघाडीवर आहेत.
बंगळुरूमध्ये असणाऱ्या मायक्रो लॅब्स लिमिटेड कंपनीकडून डोलो 650 ची निर्मिती केली जाते. त्यात डॉक्टरांकडूनही हीच गोळी मोठ्या प्रमाणावर लिहून दिली जाते. डिसेंबर 2020 मध्ये डोलो 650 गोळ्यांची विक्री 28.9 कोटी होती. 2021 मध्ये यामध्ये तुलनेत 61.45 टक्क्यांना वाढ झाली. मार्च-एप्रिल 2021 मध्ये डोलो 650 ची विक्री सर्वोच्च झाली. ती तब्बल 48 कोटीपर्यंत विक्री झाली होती. डोलो 650 च्या विक्रीच्या तुलनेत कॅलपॉलची विक्री पाहिली तर डिसेंबर 2021 मध्ये 28 कोटी अर्थात 56 टक्क्यांची ही वाढ होती. दुसऱ्या लाटेत मात्र कॅलपॉलची सर्वांत जास्त विक्री झाली होती. तब्बल 71.6 कोटींची विक्री झाली.
डॉक्टरांकडून क्रोसिनव्यतिरिक्त डोलो 650 हे औषध जास्त प्रमाणात लिहून देत आहेत. कारण, सर्व वयोगटातील लोकांना ही गोळी चालते. त्याचबरोबर त्याचे कमीत कमी दुष्परिणाम आहेत, असे डॉक्टर आणि फार्मास्युटिकल असोसिएशनकडून सांगण्यात आले. काही डॉक्टर असे सांगतात की, इतर पॅरोसिटोमोल गोळ्यांप्रमाणे डोलो 650 हादेखील एक ब्रॅण्ड आहे. ते काही वेगळे नाही. सर्व वयोगटातील लोक, हृदयविकार, किडनीचे आजार आणि मधुमेह ग्रस्त असलेले लोक ही गोळी घेऊ शकतात.
0 Comments