आमदार प्रणिती शिंदे यांची थेट सुभाष देशमुख व खा.जयसिद्धेश्वर स्वामींवर तोफ
सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या नांदनी ते बरूर रस्ता व जिल्हा परिषद सेस मधून मंजूर केलेले नांदनी येथील हनुमान मंदिर समोरील सभामंडप , गावातील बंदिस्त गटार व गाव पाणीपुरवठा अशा विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन समारंभ रविवारी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्षा आमदार प्राणिती शिंदे याच्या हस्ते व कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.
यावेळी दक्षिण तालुका अध्यक्ष हरीश पाटील माजी सभापती अशोक देवकते, राधाकृष्ण पाटील,अनंत म्हेत्रे, सरपंच शिवानंद बंडे, बनसिद्ध बंने, मोतीलाल राठोड,श्रीदीप हसापुरे, उमाशंकर रावत, गंगाबाई डोमनाळे,इंदुमती सुरवसे, संगमेश बगले यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांनी आपल्या भाषणात भारतीय जनता पार्टीवर जोरदार टीका केली, भाजपने केवळ जात धर्माचे राजकारण केले, महाराज म्हणून त्यांचा आम्ही आदर करतो जेव्हा ते राजकारणात उतरले तेव्हा देशाची उलटी गिनती सुरू झाली.
मागच्या सात वर्षात भारतीय जनता पार्टीने दक्षिण सोलापूर तालुक्यात किती विकास केला? रस्त्याची किती कामे केली? कोणता प्रोजेक्ट आणला असे थेट सवाल करत खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महाराज आणि आमदार सुभाष देशमुख यांच्यावर निशाणा साधला,
0 Comments