खून करून गळ्याला दोरी बांधून महिलेचा मृतदेह फरफटत नेला
केज तालुक्यातील नांदुरघाट येथील हंगेवाडी येथे पारधी समजातील महिलेचा डोक्यात दगड घालून खून
डोक्यात दगड घातल्या नंतर गळ्यात रस्सी बांधून सुमारे शंभर फूट मृतदेह फरफटत नेला
घटनास्थळी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांची भेट
श्वानपथक घटनास्थळी
केज तालुक्यातील नांदूरघाट जवळील हंगेवाडी येथे पारधी समाजातील एका ६० वर्षीय महिलेचेचा दगडाने ठेचुन खून झाला आहे.
खून केल्या नंतर खुनाचा तपास करण्यासाठी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत व सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे घटनास्थळी हे पोहोचले. खुन्याचा माग काढण्यासाठी श्वान पथकाची मदत घेण्यात आली आहे.
या बाबतची माहिती अशी की, दि. २२ जानेवारी रोजी केज तालुक्यातील नांदूर घाट येथून जवळच असलेल्या हंगेवाडी येथे सखुबाई बन्सी शिंदे या
पारधी समाजातील ६० वर्षीय महिलेचा रात्री अज्ञात व्यक्तीने डोक्यात दगड घालून खून केला आहे. खून केल्या नंतर मारेकऱ्याचे अत्यंत निर्दयीपणे मयताच्या गळ्याला रस्सी बांधून तिचा मृतदेह सुमारे शंभर फुटापर्यंत फरफटत नेला. सदर घटना वस्तीवर राहणाऱ्यांंनी हि माहिती
पोलीसांना कळविताच सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि केज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे हे घटनास्थळावर पोहोचले. त्या ठिकाणी संशयित मारेकऱ्याचे काही वस्तू असल्याचा संशय असून अधिक तपास करण्यासाठी पोलिसांनी श्वानपथकाला पाचारण केले आहे.
दरम्यान सदर खून हा मयत महिलेच्या नातेवाईकांनी केल्याचा संशय असून संशयीत मारेकरी फरार आहे. त्याचा पोलीस तपास घेत आहेत. संशयित खुनाचा तपास घेण्यासाठी श्वानपथकाने घटनास्थळी माग काढण्याचा प्रयत्न केला. सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, केज पोलीस ठाण्याचे प्रभारी साहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे,
पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे, साहाय्यक फौजदार चालक कादरी, पोलीस पथकातील कर्मचारी मेसे, भालेराव, शिवाजी शिनगारे, मतीन शेख, अशोक नामदास, महादेव बहिरवाळ, आय बाईकचे सचिन अहंकारे, शफावद्दीन, सुहास जाधव यांनी घटनास्थळी संशयित मारेकऱ्याचा तपास घेत आहेत.
दरम्यान पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नांदूरघाट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविला आहे. अद्याप केज पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

0 Comments