मो. सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आरोपीला अटक करण्यात आली सांगोला पोलीस स्टेशनची मोठी कामगिरी
सांगोला पोलीस ठाणे , सोलापूर ग्रामीण :: सांगोला पोलीस ठाणे गु.र.नं. ६ ९ / २०२२ भा.द.वि कलम ३७ ९ , ३४ प्रमाणे दिनांक २२/०१/२०२२ रोजी गुन्हा दाखल दिनांक २१/०१/२०२२ रोजी श्री . दिपक गणपत जानकर वय ३ ९ धंदा मजुरी रा . पुजारवाडी ता . सांगोला जि . सोलापुर यांनी त्यांच्या मालकीची मो . सायकल त्यांचे राहते घरासमोरून पुजारवाडी ,
सांगोला ता . सांगोला येथुन अज्ञात आरोपीने चोरून नेल्याबाबत दिलेल्या तक्रारीप्रमाणे मो . सायकल चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला . सदर गुन्हयाचा तपास पोहेकॉ / १६२६ वाघ , सांगोला पोलीस ठाणे हे करीत आहेत . सांगोला तालुका व परीसरातुन मो . सायकल चोरीचे प्रमाणे वाढल्याने
सदर मो . सायकल चोरी केलेल्या अज्ञात आरोपीचा शोध सांगोला व परीसरात घेत असताना बातमीदारांकडुन मिळालेल्या माहीतीप्रमाणे व अद्यावत तपास यंत्रणेच्या मदतीने १ ) योगेश काकासो देशमुख वय २४ वर्षे २ ) सिध्दार्थ आबासो चव्हाण वय २० वर्षे ३ ) चंद्रकांत काकासो देशमुख वय २१ वर्षे ४ ) बाळासो आण्णासो मोरे वय २६ वर्षे सर्व
रा . सोनंद ता . सांगोला यांनी संगनमत करून मो . सायकल चोऱ्या करीत असल्याचे माहीती मिळाल्याने सदर आरोपीस त्याचे राहते घरी मौजे सोनंद ता . सांगोला येथे जावुन शोध घेतला आसता तो त्याचे राहते घरी मिळुन आला त्यावेळी सदर आरोपी क्रमांक १ याचे घराचे पाठीमागे शोध घेतला असता
त्याचे घराचे पाठीमागे असलेल्या शेतीच्या बांधालगत लावलेल्या मोटार सायकली , महेंद्रा पिकअप व त्यामध्ये दोन पानबुडी मोटरा दिसल्या त्यास सदर मोटार सायकली , महेंद्रा पिकअप व त्यामधील दोन पानबुडी मोटरा बाबत विचारपुस केली असता तो उडवाउडवीचे उत्तर देवु लागला
त्याचा आम्हाला चोरीचा असल्याचा संशय आल्याने त्या मोटार सायकली , महेंद्रा पिकअप व त्यामधील दोन पानबुडी मोटरा जप्ती पंचनामा व मेमोरंडम पंचनामा करून ताब्यात घेतल्या त्याचे वर्णन खालील प्रमाणे १ ) एक बजाज कंपनीची डिस्कवर काळ्या रंगाची मो . नायकल तिचा आरटीओ . नं . MH 13BA 0146 तिचा
इंजिन नं . 1ZMBTL81331 २ ) एक होंडा कंपनीची HI डीलक्स काळ्या रंगाची मो . सायकल तिचा आरटीओ.नं . MH 10CS 3986 तिचा इंजिन नं . HATTEPH9807227 ३ ) एक होंडा कंपनीची युनिकॉर्न CB काळ्या रंगाची मो . सायकल तिचा आरटीओ . नं . MH 45 AG 2447 तिचा इंजिन नं . KC31E80050219 ४ ) एक होंडा कंपनीची युनिकॉर्न CB काळ्या रंगाची
मो . सायकल तिचा आरटीओ . नं . MH 45 AG 4394 तिचा इंजिन नं . KC31ES0139540 ५ ) एक होन्डा कंपनीची शाईन काळ्या रंगाची मो . सायकल तिचा आरटीओ . नं . MH 45 AC 5935 तिचा इंजिन नं JC65E71133996 ६ ) एक 3 HP व 5 HP विहीरीतील पाणबुडी ७ ) एक महेंद्र पिकअप तिचा आरटीओ . नं . MH 10Z8299 तिचा
इंजिन नं . GG71.155372 वरील मोटार सायकली , महेंद्रा पिकअप व त्यामधील दोन पानबुडी मोटरा हया कोठुन चोरल्या आहेत याबाबत चौकशी केली असता यातील अटक आरोपीतांनी संगनमत करून चोरल्या आहेत त्यांना अटक केलेली आहे . सदर गुन्हयात एकूण पाच मो . सायकल , एक महेंद्रा पिकअप ,
दोन विहीरीतील पाणबुडी सुमारे चार लाख तेवीस हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल त्याच्या कब्ज्यातुन जप्त केलेला आहे . सदर मो . सायकली मालक यांनी सांगोला पोलीस ठाणे येथे आवश्यक कागदपत्रांसह संपर्क साधण्याबाबत पोनि श्री . जगताप सो | यांनी कळविलेले आहे . सदर आरोपीतांनी सांगोला व मंगळवेढा , पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या मो . सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत .
सदर गुन्हयाचा तपास मा . श्री तेजस्वी सातपुते मॅडम , पोलीस अधिक्षक सोलापूर ग्रामीण , मा . श्री . हिमंत जाधव सोो , अपर पोलीस अधिक्षक सोलापूर ग्रामिण , मा . श्री . राजश्री पाटील मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी मंगळवेढा विभाग मंगळवेढा , मा . पोनि . श्री . सुहास जगताप सो , यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकों / १६२६ वाघ हे तपास करीत असुन
त्यांना शहर बीट व डी.बी पथकातील सपोनि / यमगर सो , पोहेकॉ / १४१३ काझी , पोना / १४४० पवार , पोना / १५७७ कोरे , पोकॉ / १२६२ पाटील , पोकॉ / ७४५ जाधव व सायबर पोलीस ठाणेचे पोकॉ / अन्दर आतार यांनी मदत करून गुन्हा उघडकीस आणुन चोरीस गेलेली मालमत्ता हस्तगत केली आहे .
टिप : - वरील मोटार सायकल नंबरची कोणाची मोटार सायकल चोरीस गेली असल्यास सांगोला पोलीस ठाणे येथे संपर्क करावा ०२१८७/२२०१०० पोहेकॉ / वाघ ९ ८५०८४१६२६ , पोहेकॉ / १४१३ काझी ८३२ ९ २२०३४३ ( सुहास लक्ष्मण जगताप ) पोलीस निरीक्षक सांगोला पोलीस ठाणे , सोलापूर ग्रा .

0 Comments