सोलापूर जिल्हा दुध संघाच्या निवडणुकीबाबत सांगोला -शेतकरी कामगार पक्षाची बैठक संपन्न
जिल्हा दुध संघाच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असुन सद्या बेरोजगारी मध्ये शेतकऱ्यांचा आर्थिक नाडी असलेला हा सोलापूर जिल्हा दुध संघ आहे.ह्या संघाची निवडणुक जाहीर झाल्यामुळे शेतकरी कामगार पक्षाच्या प्रमुख नेत्यांची व जिल्हा दुध संघाच्या मतदारांची बैठक शेतकरी सहकारी सुत गिरण सांगोले येथे संपन्न झाली .
सदर बैठकीस चंद्रकांत(दादा) देशमुख,बाबासाहेब देशमुख,अनिकेत देशमुख,दादाशेठ बाबर,बाबासाहेब करांडे,मारुती लवटे,मारुती ढाळे,मारुती बनकर,नानासो लिगाडे ,बाळासाहेब पाटील,चिदानंद स्वामी इत्यादी नेते ,हनुमंत कोळवले,संतोष देवकते,आनंदा यमगर,प्रकाश मेटकरी,दाद लवटे यांच्या सहित दुध संघाचे मतदार उपस्थित होते.
सदर बैठकीमध्ये शेकापक्षाला दोन जागा लढवण्याचा निर्णय घेण्यात आला.तसेच कोणाशी आघाडी करायची ह्याचा निर्णय कार्यकरत्यांशी चर्चा करुन घेण्याचा निर्णय घेण्यात आला.तसेच जिल्हा स्तरवरती चर्चा करण्यासाठी-
पाच लोकांची कमेटी बनवण्यात आली त्यामद्ये चंद्रकांत(दादा) देशमुख,दादा (शेठ)बाबर,बाबासो करांडे,नानासो लिगाडे,मारुती(आबा) बनकर ह्यांची कमेटी बनवण्यात आली आहे.
सदर कमेटीने जिल्हास्तरावरती चर्चा ,विचारविनीमय करण्यासाठीची जबाबदारी यांच्यावरती टाकण्यात आली आहे.जिल्हा दुध संघाच्या निवडणुकीबाबतचा सर्व वृतांत शेकापक्षाचे राज्याचे सरचिटणिस भाई जयंतभाई पाटिल यांच्याशी फोनद्वारे चर्चा करण्यात आली व सर्व वृतांत त्यांना कथन करण्यात आला.कमेटीने घेतलेला निर्णय भाई जयंत पाटिल यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेऊन जाहीर करण्यात येणार असलेचे ह्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.

0 Comments