ओमायक्रॉन व्हेरिएंटचा आणखी एक घातक स्ट्रेन, भारतासह 40 देशांचं टेन्शन वाढलं!
नवी दिल्ली – कोरोना व्हायरसच्या नवीन ओमायक्रॉन व्हेरिएंटने जगभरात हातपाय पसरवण्यास सुरूवात केली असतानाच आणखी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. ओमायक्रॉनचा आणखी एक घातक सब व्हेरिएंट आढळून आला आहे. या सब-व्हेरिएंटवर शास्त्रज्ञ बारीक लक्ष ठेवून आहेत. जेणेकरून भविष्यात साथीच्या रोगाच्या प्रसारावर त्याचा काय परिणाम होऊ शकतो, हे समजू शकेल. दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेला ओमायक्रॉन व्हेरिएंट अलिकडच्या काही महिन्यांत सर्वात धोकादायक प्रकार बनला आहे.
प्राथामिक माहितीनुसार ब्रिटीश आरोग्य अधिकार्यांनी ओमायक्रॉनच्या BA.2 नावाच्या नव्या व्हेरिएंटची शेकडो प्रकरणं नोंदवली आहेत. तर आंतरराष्ट्रीय डाटा असं दर्शवतो की हा व्हेरिएंट कल्पनेपेक्षा अधिक वेगाने पसरत आहे. युकेमध्ये या व्हेरिएंटची 400 हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहे. इतकच नाही तर हा घातक विषाणू जवळपास 40 इतर देशांमध्येदेखील आढळला आहे. यात भारत, डेन्मार्क आणि स्वीडन सारख्या काही देशांमध्ये सर्वात अलीकडील प्रकरणांमध्ये सब-व्हेरिएंटशी संबंधित रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे.
कोरोना विषाणूच्या विविध प्रकारांपैकी ओमायक्रॉन विषाणूचा हा प्रकार सर्वात धोकादायक मानला जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) 26 नोव्हेंबर रोजी ‘चिंताजनक’ स्वरूप असं वर्णन करून या व्हेरिएंटचं नाव ओमायक्रॉन ठेवलं. ‘चिंताजनक रूप’ ही WHO ची कोरोना विषाणूच्या अधिक धोकादायक प्रकारांसाठीची सर्वोच्च श्रेणी आहे.
कोरोना विषाणूच्या डेल्टा व्हेरिएंटलादेखील या श्रेणीमध्ये ठेवण्यात आलं होतं. कोविडचं सर्वाधिक संसर्गजन्य स्वरूप B.1.1.1.529 चे पहिल्यांदा 24 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेतून समोर आलं होतं.

0 Comments