google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळ! अवैध सावकारी प्रकरणी सराफ व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील घटना

Breaking News

खळबळ! अवैध सावकारी प्रकरणी सराफ व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील घटना

 खळबळ! अवैध सावकारी प्रकरणी सराफ व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील घटना



सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहरातील कापड बाजार येथील श्री.ज्वेलर्स सराफ दुकानातून सुरू असलेल्या अवैध सावकारीप्रकरणी एका महिलेच्या तक्रारीवरून या सराफ दुकानासह घरावर सहकार खात्याने तीन महिन्यापूर्वी टाकलेल्या धाडीत


अनेक कोरे चेक, खरेदीखते, इतर कोऱ्या पावत्या, नोंदवह्या आढळून आल्या होत्या. सदर सराफ व्यापाऱ्याकडे नोंदणीकृत सावकारी परवाना नसताना तसेच सावकारी कायद्यांतर्गत सदरचे सह्या केलेले कोरे चेक घेऊ नयेत अशी तरतूद असतानाही यांनी



सदरचे चेक बाळगल्याप्रकरणी सराफ व्यापारी अशोक नरसिंह लंगोटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सहायक निबंधक सचिन महाडिक यांनी शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून अवैध सावकारीचा गुन्हा दाखल झाला आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार गणिता दादाराव गव्हाळे (रा. रोसा, परंडा) यांच्या वडिलांच्या नावे असलेली जमीन जाकीर पटेल व सराफ अशोक लंगोटे यांनी सावकारीपोटी खरेदी घेतली होती.



या अवैध सावकारी तक्रार अर्जाच्या अनुषंगाने जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांच्या आदेशावरुन २१ सप्टेंबर २०२१ रोजी सहायक निबंधक अमोल निरडे यांच्या पथकाने अशोक लंगोटे याच्या बार्शी येथील कापड बाजार रोड येथे असलेल्या श्री ज्वेलर्स या दुकानावर सचिन महाडिक यांच्या पथकाने धाड टाकली होती.


तसेच लंगोटे याच्या उपळाई (ठों) येथे असलेल्या घरी मनीषा गुप्ता यांच्या पथकाने धाड टाकली.सदर दोन्हीकडील धाडीमध्ये अनेक कोरे  चेक , खरेदी खते , कोऱ्या पावत्या व नोंदवह्या जप्त करण्यात आल्या होत्या , या कारवाईस तीन महिने उलटले होते.



सदर संशयित कागदपत्रांची तपासणी करुन अशोक लंगोटे हा अवैध सावकारी करत असल्याचे मत झाल्याने सहायक निबंधक यांनी १ जानेवारी रोजी दिलेल्या फिर्यादीवरुन अशोक लंगोटे विरुद्ध



सावकारी अधिनियम २०१४ कलम ३ ९ अन्वये दखलपात्र गुन्हा नोंद झाला आहे . याबाबत अधिक तपास शहर पोलीस करीत आहेत.



गेल्या दोन दिवसात सावकार रंजेश मुसळे व श्री ज्वेलर्सचे सराफ अशोक लंगोटे या दोन अवैध सावकाराविरुध्द सहायक निबंधकांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केल्याने अवैध सावकारांचे धाबे दणाणले आहेत.

Post a Comment

0 Comments