डॉ.आंबेडकर फाउंडेशन च्या महापुरुषांच्या यादीत लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंच्या नावाचा समावेश करण्याचे केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी दिले आदेश
सांगोला आरपीआय तालुका अध्यक्ष श्री खंडू (तात्या) सातपुते आरपीआय जिल्हा
युवक अध्यक्ष श्री रामस्वरूप (बापू) बनसोडे आरपीआय मातंग आघाडी जिल्हा कार्याध्यक्ष श्री दामोदर भीमराव साठे यांनी केंद्रीय राज्यमंत्री श्री रामदासजी आठवले साहेब यांचे मनापासून आभार......
मुंबई दि.4 - केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत डॉ. आंबेडकर फाउंडेशनद्वारे महापुरुषांच्या जयंती निमित्त प्रबोधनात्मक कार्यक्रमासाठी दोन लाख रुपयांची मदत दिली जाते. त्यानुसार लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीला दोन लाख रुपयांचे अनुदान देण्यात यावे
असे मागणी करणारे पत्र महाराष्ट्रातून डॉ. आंबेडकर फाउंडेशन ला पाठविण्यात आले.त्याला उत्तर देताना डॉ आंबेडकर फाऊंडेशन च्या अधिकाऱ्यांनी अत्यंत गंभीर चूक करीत चुकीचा शब्दप्रयोग करून अण्णा भाऊ साठे यांचा डॉ आंबेडकर फाउंडेशन कडे असलेल्या महापुरुषांच्या यादीत नामोल्लेख नसल्याने अण्णा भाऊ तेव्हढे महत्वाचे नसल्याचे म्हंटले आहे.
ही गंभीर चूक असून याबाबत माहिती मिळताच रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी तात्काळ दिल्लीला धाव घेऊन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाचे सेक्रेटरी सुब्रमण्यम यांना आदेश देऊन डॉ. आंबेडकर फाऊंडेशन च्या महापुरुषांच्या यादीत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या नावाचा समावेश तात्काळ करण्याचे सांगितले.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे हे जागतिक कीर्तीचे साहित्यिक; विचारवंत; लेखक आणि क्रांतिकारी प्रबोधनकारी महापुरुष आहेत. त्यांना भारतरत्न किताब द्यावा अशी आपण स्वतः मागणी केली आहे.त्यामुळे डॉ आंबेडकर फाऊंडेशन च्या महापुरुषांच्या यादीत अण्णा भाऊ साठेंचे नाव त्वरित समाविष्ट करण्याचे आदेश सामाजिक न्याय मंत्रालयाला केंद्रीय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी दिले. त्यामुळे संपूर्ण मातंग समाजाला आपले आवाहन आहे की मोदी सरकार मातंग समाजाच्या पाठीशी आहे.मी स्वतः मातंग समाजसोबत आहे असे आश्वासन ना रामदास आठवले यांनी आज जाहीर केले.
डॉ आंबेडकर फाऊंडेशन द्वारे संत चोखा मेळा; संत नामदेव;संत रविदास;महात्मा ज्योतिबा फुले; डॉ बाबासाहेब आंबेडकर यासह अनेक महापुरुषांच्या जयंतीनिमित्त प्रबोधनात्मक कार्यक्रमासाठी दोन लाख रुपये अनुदान संस्थांना दिले जाते.आता या यादीत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे ही नाव समाविष्ट करण्यात आले आहे.केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी सामाजिक न्याय मंत्रालय सेक्रेटरी सुब्रह्मण्यम यांना याबाबत तात्काळ आदेश दिल्याने सर्व संबंधित अधिकारी वर्गाने ही चूक मान्य केली असून महापुरुषांच्या यादीत अण्णा भाऊ साठेंचे नाव त्वरित समाविष्ट करण्याचे मान्य करण्यात आले आहे अशी माहिती ना. रामदास आठवले यांनी दिली आहे.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जागतिक कीर्तीचे साहित्यिक क्रांतिकारी लोकशाहीर आहेत.त्यांचे लेखन समाज प्रबोधन करणारे आहे.लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे कार्यकर्तुत्व भारतरत्न या सर्वोच्च किताबाने सन्मानित करण्यायोग्य आहे. त्यासाठी माझा स्वतःचा प्रयत्न आहे.
आता डॉ आंबेडकर फाउंडेशन तर्फे दरवर्षी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त आयोजित प्रबोधनकारी कार्यक्रमाला दोन लाख रुपयांचे अनुदान सामाजिक संस्थांना मिळेल असे ना.रामदास आठवले यांनी कळविले आहे.
0 Comments