सोलापुर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी श्री हरिभाऊ पाटील
सांगोला तालुक्यातील चिंचोली या गावचे हरिभाऊ पाटील यांची सोलापुर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे . महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सोलापुर जिल्हा अध्यक्ष डॉ. श्री मा.धवलसिंह मोहिते पाटील यांनी कार्यकारणी निवडी
दि . 25 जानेवारी . रोजी सोलापूर येथे जाहीर करण्यात आली . नुतन जिल्हा उपाध्यक्ष हरिभाऊ पाटील यांनी यापुर्वी सोलापुर जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष , सांगोला तालुका काँग्रेस सेवादलाचे तालुकाध्यक्ष म्हणुन अतिशय चांगल्या प्रकारे काम केले आहे .
तसचे तालुका समन्वयक समितीचे सदस्य म्हणुनही काम केले आहे तसेच चिंचोली तलावात येथे कायमस्वरूपी पाणी सोडण्यासाठी चिंचोली तलाव येथे रस्ता रोको आंदोलन केले होते. काँग्रेसचे निष्ठावंत कायकर्ते म्हणुन त्यांनी यापूर्वी काम केले असल्याने देशाचे नेते मा .सुशिलकुमार शिंदे साहेब तसचे काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष आमदार प्रणिती ताई शिंदे प्रांतिक सदस्य प्रा . पी.सी. झपके , जिल्हाअध्यक्ष डॉ. श्री मा.धवलसिंह मोहिते पाटील
यांनी निर्णय घेवून पक्षाचे काम करण्याची संधी हरिभाऊ पाटील यांना दिली आहे . काँग्रेस पक्षाचे कार्य सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम प्रामाणिकपणे करणार असल्याचे मत नुतन जिल्हा उपाध्यक्ष हरिभाऊ पाटील यांनी व्यक्त केले .

0 Comments