google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 काँग्रेस तालुका अध्यक्षपदी सुनिल भोरे यांची तर वरिष्ठ उपाध्यक्ष पदी रवींद्र कांबळे यांची निवड

Breaking News

काँग्रेस तालुका अध्यक्षपदी सुनिल भोरे यांची तर वरिष्ठ उपाध्यक्ष पदी रवींद्र कांबळे यांची निवड

 काँग्रेस तालुका अध्यक्षपदी सुनिल भोरे यांची तर वरिष्ठ उपाध्यक्ष पदी रवींद्र कांबळे यांची निवड



सांगोला (साप्ता.शब्दरेखा एक्सप्रेस ):-तालुका अध्यक्ष आणि जिल्हा काँग्रेस कार्यकारिणीच्या निवडी जिल्हाध्यक्ष डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांनी मंगळवारी रात्री उशिरा प्रसिद्धपत्रकाद्वारे जाहीर केल्या.


सांगोला तालुका काँग्रेस अध्यक्ष पदाची जबाबदारी   सुनिल भोरे यांची पुनश्च निवड केली. तर वरिष्ठ उपाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील यांचे विश्वासू रविंद्र कांबळे यांची निवड करण्यात आली आहे  


 जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांनी जिल्हाभर काँग्रेस मधील कार्यकर्त्यांची मरगळ दूर करण्यासाठी आणि पुन्हा "हाताचा पंजा"बळकट करण्यासाठी सर्वसमावेशक निवडी जाहीर केल्या.


सांगोला तालुक्यातील  जिल्हाउपाध्यक्ष पदाची जबाबदारी माजी तालुका अध्यक्ष राजकुमार पवार आणि  हरिभाऊ पाटील यांच्यावर पक्षाने सोपवली आहे. सरचिटणीस पदी अभिषेक कांबळे यांची तर शहराध्यक्ष पदी तौहीद मुल्ला यांची निवड केली आहे.जिल्हा काँग्रेस कार्यकारिणी सदस्य पदी ऍड महादेव कांबळे आणि अजय इंगवले यांची निवड केली आहे.


सर्व नूतन पदाधिकारी यांच्या निवडीने सांगोला तालुक्यातील काँग्रेस पक्षाला चांगले दिवस येतील,अशी अपेक्षा तालुक्यातील काँग्रेसप्रेमींना लागून राहिली आहे.

Post a Comment

0 Comments