google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एकाला अटक ; तीन दिवसाची पोलिस कोठडी

Breaking News

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एकाला अटक ; तीन दिवसाची पोलिस कोठडी

 आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एकाला अटक ; तीन दिवसाची पोलिस कोठडी



सांगोला प्रतिनिधी – सांगोला पुजारवाडी येथील केशव हरिबा लोखंडे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तपास अधिकारी यांनी गुन्ह्यातील आरोपी प्रशांत बुरांडे यास अटक करून सांगोला न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश सो यांनी त्यास शनिवार १५ जानेवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यातील उर्वरित तीन आरोपींच्या तपासासाठी पोलिस पथके रवाना केल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी दिली आहे.



सांगोला पुजारी येथील अमोल केशव लोखंडे याने  सांगोला शहरातील खाजगी सावकाराकडून व्याजाने पैसे घेतल्याने लाखों रुपयाचे देणे झाले म्हणून मुलगा घर सोडून गेला तर त्या सावका-यांनी त्याच्या घरी जाऊन वडील व भावास दुकानात जाऊन  पैशाचा लावून त्याच्या वडिलांना मानसिक त्रास दिला. अखेर सावकारांच्या  सततच्या त्रासाला कंटाळून त्यांची नावे चिठ्ठीत लिहून केशव हरिबा लोखंडे -६२ यांनी १० जानेवारी रोजी दुपारी दीडच्या सुमारास 



राजुरी ता. सांगोला येथील वनविभागाच्या कार्यक्षेत्रातील सिसमच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेनंतर त्यांचा दुसरा मुलगा नीलेश लोखंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गौरव चांडोले, राहुल पाथरुटकर स्वप्निल नागणे व प्रशांत बुरांडे यांच्यावर मृत केशव लोखंडे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी  भादंवि कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल केला होता



. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंतकुमार काटकर करीत आहेत. गुन्ह्यातील आरोपी प्रशांत बुरांडे यास श्रीपुर ता. माळशिरस येथून अटक केली तर अन्य तिघे जण फरार झाल्याने पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.

Post a Comment

0 Comments