google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 कोळे ता.सांगोला येथील स्टेट बँक ऑफ इंडिया येथील तीन अधिकारी यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह ....!

Breaking News

कोळे ता.सांगोला येथील स्टेट बँक ऑफ इंडिया येथील तीन अधिकारी यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह ....!

 कोळे ता.सांगोला येथील स्टेट बँक ऑफ इंडिया येथील तीन अधिकारी यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह ....!



कोळे / वार्ताहर ....कोळे ता. सांगोला येथील नामांकित राष्ट्रीयकृत स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेचे वरिष्ठ तीन अधिकारी यांची कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर ही बँकेचे कामकाज शाखाधिकारी यांनी चालू ठेवले यातून कोरोना रोगाचा प्रसार वाढला तर याला जबाबदार कोण ? स्थानिक प्रशासन यांनी झोपेचे सोंग घेतलेले आहे. वरील तीनही  अधिकारी बँकेचे काम बंद ठेवणे आवश्यक होते, 



तरी संबंधित शाखाधिकारी यांनी बँकेचे कामकाज सुरू ठेवले सर्वसामान्य जनतेच्या जिवनाशी खेळण्याचा अधिकार यांना कोणी दिला.  संपूर्ण देशात कोरोनाचा उद्रेक पहावयास मिळत आहे. वरील विषयावर विचार - विनिमय करून संबंधित प्रशासन काय कारवाई करणार का ? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे. जर स्टेट बँक ऑफ इंडिया अशीच चालू राहिली तर 



यातून कोरोना रोगाचा उद्रेक होणार हे मात्र नक्की. सर्वत्र सॅनिटायझर लावणे / मास्क लावणे  बंधनकारक आहे,परंतु कोळे भागात मात्र या नियमाची पायमल्ली होताना दिसून येते . शासनाच्या निर्देशानुसार रात्रीची संचारबंदी व दिवसा जमावबंदी आहे पाच लोकांपेक्षा जास्त लोक थांबण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे. परंतु  या नियमाची अंमलबजावणी सांगोला तालुक्यात कोठेही होत नसल्याचे दिसून येते.

Post a Comment

0 Comments