केंद्र शासनाच्या विद्यांजली उपक्रमांतर्गत २५० शाळा दत्तक घेतल्या जाणार – सोलापूर
सोलापूर , 16 जानेवारी जिल्ह्यातील किमान २५० शाळांमध्ये केंद्र शासनाचा ‘विद्यांजली’ उपक्रम राबवण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा दत्तक घेऊन त्या शाळांमध्ये विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. सामाजिक जबाबदारी व समुदायाच्या सहाय्याने शाळांना पायाभूत सुविधा व गुणवत्ता वाढीच्या दृष्टिकोनातून मजबूत करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. येत्या १५ दिवसांत शाळांची निवड केली जाणार आहे.
सोलापूर विद्यापीठाने ‘विद्यांजली’ उपक्रमाची माहिती देण्यासाठी ऑनलाइन कार्यशाळा घेऊन माहिती दिली. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या शाळांमध्ये स्वच्छ शाळा, सुंदर शाळा उपक्रम यशस्वी झाला. त्या धरतीवर ‘विद्यांजली’ या उपक्रम शिक्षण विभागातील अधिकारी व शिक्षक, कर्मचारी सर्वतोपरी मदत केल्याने शक्य झाले. हा उपक्रम एक आदर्श मॉडेल कसे तयार होईल, त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी मदत करण्याचे अश्वासन दिले
आहे. विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये शाळा दत्तक घेतील. महाविद्यालयांच्या मदतीसाठी नोडल अधिकारी नेमण्यात येतील.या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या कुलगुरू डाॅ. मृणालिनी फडणवीस या होत्या.
0 Comments