google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 'बाबा, आता माझ्यामुळे तुम्हाला त्रास...'; 6 पानी सुसाइड नोट लिहून महिलेची आत्महत्या

Breaking News

'बाबा, आता माझ्यामुळे तुम्हाला त्रास...'; 6 पानी सुसाइड नोट लिहून महिलेची आत्महत्या

 'बाबा, आता माझ्यामुळे तुम्हाला त्रास...'; 6 पानी सुसाइड नोट लिहून महिलेची आत्महत्या


जयपूर, 16 जानेवारी : अजमेरमध्ये पतीचे विवाहबाह्य संबंध  असल्याचं कळाल्यामुळे महिलेला जबर धक्का बसला होता. त्यात सासरची मंडळींही तिला सतत त्रास देत होती. या त्रासातून महिलेने धक्कादायक पाऊल उचललं आणि स्वत:चाच जीव  घेतला. अनुराधाच्या मृत्यूनंतर 6 पानी सुसाइड नोट समोर आलं आहे.


सुसाइड नोटमध्ये अनुराधाने लिहिलं आहे की, बाबा तुम्हाला माझ्यामुळे आता कोणासमोरही झुकावं लागणार नाही. यासाठी मी स्वत:ला संपवत आहे. माझ्या दोन वर्षांच्या मुलीची हत्या करण्याचं धैर्य माझ्यात नव्हतं, म्हणून हिची काळजी घ्या. तीन वर्षांपूर्वी अनुराधाचं लग्न झालं होतं. तिची पती जर्मनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. अनुराधाच्या पतीवर विवाहबाह्य संबंधासह सासरच्या मंडळींकडून शोषण केल्याचा आरोप लावण्यात आला आहे.


वैशालीनगर मधील शिव सागर कॉलनीत राहणारे मधुसूदन सोमानी यांची मुलगी अनुराधा (31) हिने शनिवारी गळफास घेऊ आत्महत्या केली. यावेळी घरात आई-वडील आणि भाऊ नव्हते. केवळ दोन वर्षांची मुलगी अनन्या होती. कुटुंबातील सदस्य घरी पोहोचले तेव्हा ती लटकलेल्या अवस्थेत दिसली. यानंतर पोलिसांना सूचना देण्यात आली.शनिवारी रात्री अनुराधा आपल्या दोन वर्षांची मुलगी अनन्यासह घरात एकटी होती. तिचे आई-वडील मुलीच्या सासरी सुरू असलेले प्रश्न सोडवण्यासाठी समाजातील लोकांना भेटायला गेले होते. कुटुंबीय घरी परतले तेव्हा त्यांना जबर धक्का बसला. अनुराधाच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, पती अनिरूद्ध तिला सासरी सोडून जर्मनीला निघून गेला होता. दोघे तीन वर्षात केवळ 6 महिने एकत्र राहिले. सासरी तिचे सासू-सासरे आणि दीर शारिरीक आणि मानसिक त्रास देत होते. व्हिजा मिळत नसल्याचं कारण सांगून तो तिला जर्मनीला घेऊन जात नव्हता.



ती जर्मनीला गेली तेव्हा गर्भवती असल्याचं कळालं. यानंतर सासरच्या मंडळींनी जबरदस्तीने तिचा गर्भपात केला. दुसऱ्या मुलीच्या वेळीही तिच्यावर असात अत्याचार सुरू होता. दुसऱ्या प्रसुतीदरम्यान ती भारतात आली. त्यानंतर ती पुन्हा जर्मनीत गेल्यानंतर पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचं समोर आलं. तिने विरोध केला तर पती तिला त्रास देऊ लागला. शेवटी त्याने तिला भारतात सासरी पाठवले. येथेही तिच्यावर सासरच्या मंडळींकडून अत्याचार केले जात होते. तिच्यावर सातत्याने होत असलेल्या अत्याचारामुळे अनुराधाने शेवटी आत्महत्येचं पाऊल उचललं.

Post a Comment

0 Comments