सोलापूर | दिलीप धोत्रेंच्या शपथेला अर्थ काय?
पंढरपूर : सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये एक ही नगरसेवक, एक ही पंचायत समिती सदस्य आणि एकही जिल्हा परिषद सदस्य नसलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेशचे नेते दिलीप धोत्रे यांनी अजब शपथ घेतली. राज्यामध्ये मनसेचे नेते अध्यक्ष राज ठाकरे हे भारतीय जनता पार्टी सोबत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवण्याचे नियोजन करत आहेत मात्र पंढरपुरात धोत्रे हे भाजपच्या विरोधात जाऊन आमदार प्रशांत परिचारक यांचा पाडाव करण्याची भाषा करू लागले आहेत मात्र त्यांच्या शपथेला अर्थच नाही असा सूर राजकीय वर्तुळातून ऐकण्यास मिळत आहे.
पंढरपुर नगरपालिकेवर गेली 27 वर्ष सत्ता गाजवून तीर्थक्षेत्र पंढरपुरला भकाल करणाऱ्या परिचारकांना विरोध आणि विठू नगरीचा विकास हेच अंतिम ध्येय आहे. प्रत्येक परिचारक विरोधकाला बरोबर घेऊन सत्ता काबीज करणार आहे. परिचारकांना शहरातून मोठा विरोध आहे. मी कुणालाही मॅनेज होणार नाही. माझं ध्येय परिचारक विरोधच आहे. परीचारकांचा पाडाव केल्याशिवाय मी मरणार नाही अशी शपथच धोत्रे यांनी पत्रकार परिषदेत घेतली.
परीचारकांचा पाडाव करण्याची हीच ती वेळ असल्याने सर्वांनी एकत्र यावे असे आवाहन त्यांनी केले.नगरपालिका निवडणूकीच्या तोंडावर काका - बापू आघाडी परीचारकांची बी टीम असल्याची चर्चा सुरुये. त्या पार्श्वभूमीवर धोत्रे यांनी पत्रकार परिषदेत या चर्चेला पूर्णविराम दिला.
परीचारकांच्या विरोधात एकास एक लढत देण्यासाठी विरोधकांची मोट बांधणार आहे. पंढरपूरच्या विकासासाठी परिचारक विरोधकांना हात जोडून सोबत घेणार आहे. परिचारक विरोधी आघाडीचे नाव स्व. भारत नाना भालके पंढरपूर विकास आघाडी असल्याचे धोत्रे यांनी जाहीर केले.
परिचारक आघाडी पंढरपूरकरांना मूलभूत सुविधा देण्यात अपयशी ठरलीय. करोडो रुपयांचा निधी मिळून देखील तीर्थक्षेत्र म्हणून कुठलाच विकास झाला नाही. परीचारकांच्या फोडाफोडीचे राजकारण आम्ही चालू देणार नाही. परीचाराकांच्या प्रत्येक राजकीय हालचालीवर आमचे लक्ष आहे.आमच्या आघाडीत भालके, काळे ,पाटील यांच्यासह राष्ट्रवादी, सेना, काँग्रेस इतर सर्व राजकीय, सामाजिक संघटनेसोबत चर्चा सुरू आहे. लवकरच ही आघाडी मूर्त स्वरूप घेईल. असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
परिचारकांना विरोध करणाऱ्यांना बी टीम म्हणून बदनाम करण्याचे षड्यंत्र असल्याचा आरोप धोत्रे यांनी केला. नागेश काका भोसले आपली भूमिका स्पष्ट करतील. नागेश काका आणि मी एकत्र फिरतो, सामाजिक कार्यक्रम करतो. मात्र नागेश काका भोसले आपली राजकीय भूमिका स्वतः स्पष्ट करतील असे धोत्रें म्हणाले.
या पत्रकार परिषदेला कोळी महासंघाचे अरुण भाऊ कोळी, संजय बंदपट्टे, दत्ता भोसले, जयवंत भोसले, शशिकांत पाटील, महेश पवार , संतोष कवडे आदी उपस्थित होते.
0 Comments