google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मी तुझ्याशी लग्न करतो, मुलासह मी तुला सांभाळतो असे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार; मंगळवेढ्यातील तरुणावर गुन्हा दाखल

Breaking News

मी तुझ्याशी लग्न करतो, मुलासह मी तुला सांभाळतो असे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार; मंगळवेढ्यातील तरुणावर गुन्हा दाखल

 मी तुझ्याशी लग्न करतो, मुलासह मी तुला सांभाळतो असे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार; मंगळवेढ्यातील तरुणावर गुन्हा दाखल 


मी तुझ्याशी लग्न करतो, तुझ्या मुलासह मी तुला सांभाळतो, स्वतंत्र खोली करून ठेवतो’ असे म्हणून 30 वर्षीय महिलेला लग्नाचे आ


मिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी एका संशयित आरोपीविरुद्ध ता.मंगळवेढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



याबाबत सविस्तर माहिती अशी की, संशयित आरोपी आकाश कलाप्पा केदार (रा.डोणज ता.मंगळवेढा) याने सांगली जिल्ह्यातील मिरज येथील एका 30 वर्षीय महिलेला ‘मी तुझ्याशी लग्न करतो, तुझ्या मुलासह मी तुला सांभाळतो.



स्वतंत्र खोली करून ठेवतो असे आमिष दाखवून डोणज गावामध्ये स्वतंत्र खोली करून ठेवले. तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर ‘तुला माझे ऐकावेच लागेल, मी तुझ्यासोबत लग्न करणार आहेच की’ अशी दमबाजी करून तिच्यासोबत दि.13 एप्रिल 2017 ते 15 नोव्हेंबर 2021 यादरम्यान वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले.



यादरम्यान पीडित महिला चार महिन्यांची गरोदर असताना त्याने ‘तू पोट खाली कर, मी तुझ्याशी लग्न करतो” असे म्हणून पीडित महिलेला शिवीगाळ व मारहाण करून घरातून हाकलून दिले, अशी फिर्याद पीडित 30 वर्षीय महिलेने दिली.



आकाश कलाप्पा केदार (रा. डोणज) या संशयित आरोपीविरुद्ध मंगळवेढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सत्यजित आवटे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments