google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर महापालिका हद्दीत गुंठेवारी बांधकामाची परवानगी द्या

Breaking News

सोलापूर महापालिका हद्दीत गुंठेवारी बांधकामाची परवानगी द्या

 सोलापूर महापालिका हद्दीत गुंठेवारी बांधकामाची परवानगी द्या


सोलापूर : पुणे, औरंगाबाद, नाशिक व लातूर महापालिकेच्या हद्दवाढ भागात ज्या पध्दतीने गुंठेवारीच्या जागेत बांधकामाची परवानगी दिली जाते त्याच धर्तीवर सोलापूर महापालिका क्षेत्रातील हद्दवाढ भागामध्ये गुंठेवारी बांधकाम परवानगी द्यावी, अशी मागणी आमदार प्रणिती शिंदे यांनी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे केली आहे.यासंदर्भात सोलापूर महापालिका आयुक्तांनी २२ डिसेंबरला सादर केलेला प्रस्तावावर तत्काळ अभिप्राय देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.



आमदार शिंदे म्हणाल्या, सोलापूर शहर व विशेषत: हद्दवाढ भागातील बहुतांश भाग हा गुंठेवारी भागातून विकसित होत आहे. महापालिका आयुक्तांनी गेल्या काही महिन्यापासून गुंठेवारी अधिनियामान्वये नियमितीकरणाचे बांधकाम परवानगी प्रकरणे थांबविली आहेत. महापालिकेने गुंठेवारी बांधकाम परवानगी सुरु केली नाही, याउलट आयुक्तांनी त्या प्लॉटची मोजणी करून आणा मगच बांधकाम परवानगी दिली जाईल अशी भूमिका घेतली आहे.



 गुंठेवारीच्या अधिनियमामध्ये अशाप्रकारची कोणतीही नोंद नाही.त्यामुळे नागरीकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पुणे महापालिका वाढीव क्षेत्रात (हद्दवाढ भाग) गुंठेवारी अधिनियमान्वये परवानगी देत आहे. गुंठेवारी विकासाचा कच्चा नकाशा तरतूद नसल्याने मोजणी नकाशा अपेक्षित नाही.



गुंठेवारी विकासाचा कच्चा नकाशा विकास योजनेशी सांगड व साधर्म साधून आरक्षण अथवा इतर वापर विभाग तपासून नियमीतीकरणाचे परवानगी दिले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. सोलापुरात गुंठेवारी बांधकामाची परवानगी मिळत नसल्याने नागरीकांमध्ये आयुक्तांच्या विरोधात मोठ्याप्रमाणात नाराजी होत असल्याचेही आमदार शिंदे यांनी म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments