google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर जिल्ह्यातील पहिली ते बारावीपर्यंत शाळा 'या' तारखेपर्यंत बंद राहणार; शिक्षकांना असणार हे काम

Breaking News

सोलापूर जिल्ह्यातील पहिली ते बारावीपर्यंत शाळा 'या' तारखेपर्यंत बंद राहणार; शिक्षकांना असणार हे काम

 सोलापूर जिल्ह्यातील पहिली ते बारावीपर्यंत शाळा 'या' तारखेपर्यंत बंद राहणार; शिक्षकांना असणार हे काम 



सोलापूर जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पहिली ते बारावी पर्यंतच्या शाळा आज सोमवार दि.१० जानेवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा परिषद प्राथमिक , माध्यमिक शिक्षण विभाग व सोलापूर मनपा शिक्षण विभागाने काढले आहेत.



दि.१५ फेब्रुवारी नंतर कोरोना स्थिती पाहून शाळा सुरू करण्याबाबत पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. शाळा बंद असल्या तरी शाळांमध्ये शिक्षकांची शंभर टक्के उपस्थिती असणार आहे.



विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिले जाणार आहे. शाळा बंद काळात दहावी व बारावी बोर्डाची व शालेय शिक्षण विभागाचे आवश्यक प्रशासकीय कामकाज मात्र नियमितपणे सुरू राहणार आहेत.



ज्या शिक्षकांनी अद्याप कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करून घेतले नाही. त्यांनी तात्काळ लसीकरण करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.



ऑनलाईन शिक्षण असतांना ज्या विद्यार्थ्यांच्या पालकाकडे स्मार्टफोन नाहीत. अशा विद्यार्थ्यांची पारावरची शाळा , गृह भेट , विद्यार्थी माध्यमातून शिक्षण सुरू ठेवण्याबाबतही सूचना देण्यात आले आहेत.



सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या पहिली ते आठवीपर्यंत २ हजार ७ ९ ६ शाळा असून यातील पावणेचार लाखाच्या आसपास विद्यार्थी संख्या आहे.



तर माध्यमिक शाळांची संख्या १ हजार ८७ इतकी असून यामध्ये चार लाखाच्या आसपास विद्यार्थी शिक्षण घेत आहेत . माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर,



प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ . किरण लोहार व सोलापूर महानगरपालिका प्रशासन अधिकारी कादर शेख यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर , मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी , महानगरपालिका आयुक्त पी शिवशंकर यांच्या आदेशानुसार सदर निर्णय घेतला आहे.

Post a Comment

0 Comments