‘मी मोदीला मारू शकतो आणि शिव्याही देऊ शकतो’ नाना पटोलेंचं वादग्रस्त वक्तव्य
‘मी मोदीला मारू शकतो व शिव्याही देऊ शकतो आणि म्हणून मोदी माझ्या विरोधात प्रचाराला आला’ असं विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
भंडारा जिल्ह्यात रविवारी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक प्रचार करण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या मतदारसंघात पाया मजबूत करण्यासाठी विविध ठिकाणी सभा घेतल्या. संध्याकाळी घेण्यात आलेल्या प्रचार सभे दरम्यान नाना पटोले यांनी पंतप्रधान मोदींवर टीकास्तत्र सोडले.
‘मी का भांडतोय, गेल्या ३० वर्षांपासून राजकारणामध्ये आहे. लोक ५ वर्षांमध्ये पिढीचा उद्धार करून घेतात, एवढ्या शाळा, कॉलेज उभारत असतात आणि आपल्या पुढच्या पिढीचा उद्धार करून टाकतात.
मी एवढ्या राजकारणात एक शाळा सुद्धा घेतली नाही, त्यामुळे मी मोदीला मारू शकतो, त्याला शिव्या देऊ शकतो आणि म्हणून मोदी माझ्या विरोधात प्रचाराला आला. एक प्रामाणिक नेतृत्व इथं आहे. त्याला हे लोक चक्रव्युहात फसवतात, असं विधान नाना पटोले यांनी लोकांशी बोलतांना केलं.
नानाच्या वक्तव्यावर आता राज्यभरातून वेगळा प्रतिक्रिया उमटत आहेत. तर भंडारा जिल्ह्याचे खासदार सुनील मेंढे यांनी ‘नाना पटोले नेहमीच बेताल वक्तव्य करत आहेत’ अशी टीका केली आहे. तसंच, भंडारा शहर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन स्वतः खासदार सुनील मेंढे हे नाना पटोले यांच्या विरोधात तक्रार दाखल करणार आहे.
0 Comments