सांगोला तालुक्यात राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसची जम्बो कार्यकारिणी जाहीर
सांगोला तालुका/प्रतिनिधी ;- गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरत असलेल्या राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची कार्यकारणी अखेर जाहीर झाली
असून बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित कार्यकारिणीत तालुकाध्यक्ष पदाची माळ अमोल सुरवसे यांच्या गळ्यात तर तालुका कार्याध्यक्ष पदाची माळ निशांत जाधव व निखील जरे यांच्या गळ्यात पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राज्याचे नेते आणि प्रदेश उपाध्यक्ष मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी भवन सांगोला येथून सोमवार दि 17 रोजी या निवडी संपन्न झाल्या.
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकारी मुलाखती नुकत्याच राष्ट्रवादी भवन सांगोला येथे घेण्यात आल्या होत्या. यावेळी सांगोला शहर आणि तालुक्यातील विद्यार्थ्यांनी अभुतपूर्व प्रतिसाद देत प्रचंड शक्तिप्रदर्शन करून पदासाठी आपली दावेदारी सादर केली होती. इच्छुकांनी जबरदस्त शक्तिप्रदर्शन केल्याने संपूर्ण तालुक्याचे लक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकारी निवडीकडे लागून राहिले होते.
अखेर सोमवार दि 17 रोजी ही प्रतीक्षा संपली आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राज्याच्या उपाध्यक्षा जयमलाताई गायकवाड, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुहास कदम, युवानेते डाॅ. पियुष साळुंखे पाटील, यशराजे साळुंखे पाटील, ज्येष्ठनेते तानाजीकाका पाटील, तालुका अध्यक्ष चंद्रकांत शिंदे, योगेश खटकाळे, विजय केदार,
नंदकुमार दिघे, अनिल दिघे, अजय गोडसे, सचिन शिनगारे, अशोक माने, बाबुराव नागणे, दिलीप नागणे, आलमगीर मुल्ला, विनोद रणदिवे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष सखुबाई वाघमारे, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष मयुरी कांबळे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी तसेच युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसची कार्यकारिणीही जाहीर करण्यात आली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सांगोला तालुका कार्याध्यक्षपदी वैभव खंडागळे, तालुका उपाध्यक्षपदी महादेव दिघे, तर जिल्हा उपाध्यक्षपदी भूषण बागल यांची नियुक्ती करण्यात आली.
राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी घेरडी येथील तडफदार युवक सचिन काकेकर तसेच सुयश बिनवडे जिल्हा संघटकपदी नानासो हाके, सरचिटणीसपदी सुलतान इनामदार, तसेच तालुका उपाध्यक्षपदी रोहन घुटुकडे, दिग्विजय दिघे, बंडू आदलिंगे, प्रतापसिंह नागणे, ओंकार शिनगारे, राहुल करांडे, सुधीर कोले, सुशांत ऐवळे व राजू बुरंगे यांची निवड करण्यात आली.
सचिवपदी करण येलपले, सरचिटणीसपदी साईप्रसाद रास्ते, रमेश माळी, उदयराज खरात, सहसचिवपदी समाधान मोरे, प्रताप महांकाळ, प्रवक्तापदी प्रसाद लोखंडे, सोशल मीडिया प्रमुखपदावर नागेश खटकाळे तर कार्यकारणी सदस्य म्हणून किसन मोरे व हर्ष मागाडे यांची नियुक्ती करण्यात आली.
0 Comments