सावधान! कोरोना बुस्टर डोसच्या नावाखाली तुमची होईल 'अशी' फसवणूक, एक फोन आणि तुमचे पैसे गायब!
सध्या जागांसह देशभरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. त्यातल्या त्यात सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.
सायबर गुन्हेगार फसवणुकीसाठी नवनवीन कल्पना लढवतात आणि लोकांना आपल्या फसवणुकीचे बळी बनवतात. अशातच, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत सायबर गुन्हेगारांनी कोरोनाच्या बुस्टर डोसच्या नावाखाली फसवणूक सुरू केली आहे.
बुस्टर डोस मिळवण्याच्या नावाखाली या ठगांनी लोकांना आपला बळी बनवण्यास सुरुवात केली आहे. बूस्टर डोससाठी नोंदणी करण्याच्या बहाण्याने ते लोकांना कॉल करतात आणि ओटीपी क्रमांक विचारतात आणि त्याद्वारे ते तुमची बँक खाती रिकामी करतात.
अशी होतेय फसवणूक
कॉल येईल आणि ठग विचारेल – तुम्हाला दोन्ही लसी मिळाल्या आहेत का?
तुम्ही हो म्हणाल.
ठग- सर तुम्हाला बूस्टर डोस घ्यावा लागेल. मी तुमची नोंदणी करत आहे. OTP येईल, तो द्या.
तुम्ही तुमचा OTP सांगताच तुमच्या बँक खात्यातून पैसे काढले जाऊ शकतात.
0 Comments