google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 शिवसेना ही माझ्या रक्ताच्या थेंबाथेंबात : आ.शहाजी पाटील

Breaking News

शिवसेना ही माझ्या रक्ताच्या थेंबाथेंबात : आ.शहाजी पाटील

 शिवसेना ही माझ्या रक्ताच्या थेंबाथेंबात : आ.शहाजी पाटील



सांगोला/ प्रतिनिधी पंढरपूर येथे बी.पी रोंगे यांच्या हॉस्पिटल उद्घाटनाच्या कार्यक्रमात आ.शहाजी पाटील यांनी केलेल्या भाषणाचा प्रसार माध्यमाने चुकीचा अर्थ घेतला. यामुळे शिवसैनिकांमध्ये व कार्यकर्त्यांमध्ये गैरसमज निर्माण झाला. परंतु हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची प्रेरणा घेऊन स्वच्छेने शिवसेना स्वीकारली आहे. यामुळे सेनेवरती नाराज होण्याचे कोणतेही काम नाही. शिवसेना हि आमच्या रक्ताच्या थेंबाथेंबात आहे. यामुळे कुणीही धुवून काढण्याचा प्रयत्न करू नये, सांगोल्यात राष्ट्रवादीचे दीपक पाटील व भाऊसाहेब रुपनर व कार्यकर्ते यांच्या पाठिंब्यामुळेच मी आमदार झालो आहे असे वक्तव्य शहाजी पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केले आहे.


या जिल्ह्याला मंत्रीपद मिळाले नाही मला पहिल्यांदाच शिवसेनेतून जनतेने निवडून दिले. मला मंत्रीपदाची संधी मिळणारच नाही परंतु तीस वर्ष निवडून आलेल्या बबनदादा यांना संधी मिळाली नाही. यासंदर्भात मी घर की मुर्गी दाल के बराबर असे विनोदी कोटी केली आहे. माझा संदर्भ हा जिल्ह्याच्या मंत्रिपदाशी होता. माझ्या आणि शिवसेनेच्या कामाविषयी होता. माझे नेते राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी सांगोला मतदार संघासाठी गेल्या दोन वर्षात 240 कोटी रुपयांचा निधी दिला. ती सर्वच्या सर्व कामे सुद्धा सुरू आहेत आणि आता नवीन एक हजार पन्नास कोटींचा वेगवेगळ्या योजना मंत्रालयाच्या वेगवेगळ्या मंत्र्यांच्या विभागात सादर केलेल्या आहेत.यावरती सर्वांनी सकारात्मक ेरा सुद्धा मारलेला आहे. सर्वसाधारणपणे येणार्‍या वर्षात सांगोला तालुक्याच्या विकासाचा आराखडा दीड हजार कोटी रुपयांचा असुन या मुख्यमंत्र्यांनी व मंत्रिमंडळानं दीड हजार कोटी पर्यंत दिलेल्या कामांपैकी 240 कोटी रुपये दिले आहेत. व पुढे एक हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव आहे. एवढी विकासकामे केली असताना त्यांच्यावर नाराज होण्याचे माझे कोणतेही कारण नाही. परंतु टीव्ही या प्रसार माध्यमत पाहिले की आमची या मंत्रिमंडळात काय चालत नाही, आम्ही तिथे गेलो तर घराकडे जावं लागतं हा माझा संदर्भ मंत्रीपद मागायला गेले तर घराकडे जावा म्हणतील अशा संदर्भाने घेतलेला आहे व भाषणात तो संदर्भ मी घेतला होता. खासदार रंजीतसिंह निंबाळकर यांना तुम्ही तर दिल्लीला मंत्रिमंडळात मंत्री व्हा अशा नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. कारण माझ्या शिवसेनेचे खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर यांचे ते चिरंजीव आहेत. याबद्दल नवीन वर्षाच्या मी त्यांना मंत्री तरी व्हावा, अशा शुभेच्छा दिल्या होत्या. अकराशे मतदान चा शिवसेनेचा तो आमच्या शिवसैनिकांच्या जीवाशी लागलेला मुद्दा आहे. परंतु 2009 सालच्या शिवसेना निवडणुकीला त्या मतदारसंघांमध्ये सोळाशे 51 मते पडलेली होती. आणि त्याच पैकी कारण होतं की, शिवसेनेचे उमेदवार रघुनाथ पाटील यांच्या शेतकरी संघटनेचं ही थोडीशी उमेदवार यातील गफलत असल्याने ही अतिशय कमी मतदान आहे.मी तो आकडा भाषणात एक-दोन वेळा सांगितलेला सुद्धा आहै की कोणतीही गणिती समीकरणं समोर ठेवून शिवसेनेत प्रवेश केलेला नाही.हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब यांच्या विचारसरणीला प्रेरित होऊन आम्ही शिवसेना स्वीकारलेली आहे. म्हणून मी तो आकडा अकराशे इतका सांगितला आहे एवढी मत असताना सुद्धा मी शिवसेनेत गेलो हे हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब यांच्या विचारधारेमुळे त्यांच्या गुणांन कौशल्यामुळे मला उमेदवारी दिल्यानंतर उद्धवजी ठाकरे साहेबांनी आश्वासित केलं होतं की, निवडून आल्यानंतर सांगोला तालुक्यातील सर्व विकास कामे केली जातील. परंतु दुर्दैवाने आम्ही पराभूत झालो. परंतु कालच्या झालेल्या निवडणुकीत एक लाख मतांनी निवडून आलो आणि तो सांगोला तालुक्याच्या विकासाचा संदर्भ घेऊन जनतेला दिलेले आश्वासन याच सभेचा मातंग वाढविण्याचा मोठा सहभाग आहे. आज अनेक बातम्या जाणीवपूर्वक दिलेल्या आहेत. मी मुळात भाजपामुळे निवडून आलो असे म्हणालोच नाही मी केवळ राष्ट्रवादीचे दीपक पाटील व कार्यकर्ते आणि यांच्या जाहीर पाठिंबा तसेच शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाऊसाहेब रुपनर यांनी शेकाप सोडला व शिवसेनेत आले त्यांची मते आणि मित्रपक्ष असलेल्या भाजपची मते आणि शिवसेनेची मते अशी आमची बेरीज झाली आणि आमदारकी आमच्या पदरात पडली. विश्वासानं तीस वर्षाचा वनवास संपून आमदारकी मिळाली. पुन्हा कुणी तरी चुकीचे वाक्य उचलून माझ्यावरती गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला परंतु मी एक कडवा शिवसैनिक असल्याने मी राजकारणात असे पर्यंत शिवसेना सोडणार नाही. कारण आम्ही बळजबरीने पक्ष स्वीकारला नसून तो माझ्या अंतकरणाने स्वीकारलेला आहे. असे म्हणत आमदार शहाजीबापू पाटील यांनी सर्व गोष्टींचा खुलासा यावेळी केला आहे.

Post a Comment

0 Comments