google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यात अवैध वाळू उपसा जोमात....

Breaking News

सांगोला तालुक्यात अवैध वाळू उपसा जोमात....

 सांगोला तालुक्यात अवैध वाळू उपसा जोमात....


वाळू माफियांवर कित्येक कारवाया होऊनही वाळू चोरी वर चाप का बसत नाही असा नागरिकांचा प्रश्न...!


सांगोला / प्रतिनिधी :सांगोला तालुक्यातील माण नदी पात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळू चोरीचे सत्र गेल्या अनेक दिवसांपासून बेधडकपणे सुरु आहे. मान नदी पात्रातून दिवस-रात्र वाळू उपसा जोमात सुरू असल्याने सांगोला तालुका अवैद्य वाळू धंद्यामध्ये जिल्ह्यात नंबर 1 ला जाऊन पोहोचला आहे. 


अवैध वाळू उपसा संबंधित अनेक वाळू माफिया वर गुन्हे दाखल होऊनही अवैध वाळू उपशाला चाप का बसत नाही...? संबंधित प्रशासनाचे वसूलदार हे हाप्ते घेऊन वाळू माफियांना सूट देत आहेत का...? 


असा प्रश्न नागरिकांतून विचारला जात आहे. सर्वसामान्य जनतेला अंधारात ठेवून प्रशासनाचे काही अधिकारी व लोकप्रतिनीधी जर लाचखोर झाले असतील तर तालुक्यात अवैध धंद्यांना उधान आल्याशिवाय राहणार नाही अशी भिती नागरिकांतून व्यक्त होत आहे.


 प्रशासनाचे काही अधिकारी वाळू माफियांना पाठीशी घालण्याचे काम करत असल्याने वाळू माफियांना कोणाचीच भीती राहिलेली नाही. 


वाळू माफिया हे नदीकाठच्या शेतकऱ्यावर जोर जबरदस्ती करून तेथून वाळू उपसा करत आहेत. शेतकऱ्यांनी विरोध केला असता त्याला जिवे मारण्याच्या धमक्याही देत आहेत तसेच  वाळू माफियांकडून अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या कित्येक घटना घडल्या


 असूनही वाळू माफियांना गजाआड करण्या ऐवजी प्रशासनाचे काही भ्रष्ट अधिकारी वाळू माफियांना पाठीशी घालत आहेत. लोकप्रतिनिधी व भ्रष्ट अधिकारी यांच्या आशीर्वादाने तालुक्यात वाळू माफियांचा धंदा जोमात सुरू आहे. 


तरी संबंधित प्रशासनाने तालुक्यातील अवैध वाळू उपसा बंद करून, वाळू माफियांना गजाआड करून शेतकऱ्यांना तसेच नागरिकांना दिलासा द्यावा असा एकच सुर सर्वसामान्य नागरिकांतून निघत आहे..

Post a Comment

0 Comments