google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 कराटे ब्लॅक बेल्ट थर्ड दान परीक्षेत निजेंद्र चौधरीचे यश

Breaking News

कराटे ब्लॅक बेल्ट थर्ड दान परीक्षेत निजेंद्र चौधरीचे यश

 कराटे ब्लॅक बेल्ट थर्ड दान परीक्षेत निजेंद्र चौधरीचे यश 


सांगोल्यातील कराटे क्षेत्रामध्ये पंधराव्या वर्षी ब्लॅक बेल्ट थर्डदान घेणारा पहिला खेळाडू


सांगोला (प्रतिनिधी): ७ जानेवारी ते ९ जानेवारी २०२२ रोजी समर्थ मंगल कार्यालय सांगोला येथे संपन्न झालेल्या तीन दिवसीय कराटे परीक्षेमध्ये निजेंद्र रतनलाल चौधरीने ब्लॅक बेल्ट थर्डदान परीक्षेत सुयश संपादन केले.



यावेळी कता फाईट टेक्निक आणि स्टमक फिटनेस इ. चा सराव घेण्यात आला. निजेंद्र सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडीअम स्कूलचा विदयार्थी आहे. तो शावोयलीन वर्ल्ड मार्शल आर्ट शाखा सांगोला, वाघमारे सरांचे कराटे क्लास शाखेमध्ये गेली 10 वर्ष सराव करीत आहे. सांगोल्यातील कराटे क्षेत्रामध्ये पंधराव्या वर्षी ब्लॅक बेल्ट थर्डदान घेणारा पहिला खेळाडू आहे. यापूर्वी ही त्याने अनेक स्पर्धेमध्ये यश मिळविले आहे.



निजेंद्र चौधरी हा सांगोल्यातील प्रसिद्ध गणेश स्वीट मार्टचे मालक रतनलाल चौधरी यांचा मुलगा आहे. या स्पर्धेसाठी त्याला श्री.सुनील वाघमारे सरांचे मार्गदर्शन लाभले.



या यशाबद्दल सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडीअम स्कूलचा मुख्याध्यापिका सरिता कापसे मॅडम, भाजपाचे तालुका अध्यक्ष मा.चेतनसिंह केदार ,मा.राजुभाई मगर यांनी त्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments