google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 गाळा भाडे भरण्याकरिता मुदत व सवलत मिळण्याविषयी व्यापारी असोसिएशनचे मुख्याधिकारी यांना निवेदन

Breaking News

गाळा भाडे भरण्याकरिता मुदत व सवलत मिळण्याविषयी व्यापारी असोसिएशनचे मुख्याधिकारी यांना निवेदन

 गाळा भाडे भरण्याकरिता मुदत व सवलत मिळण्याविषयी व्यापारी असोसिएशनचे मुख्याधिकारी यांना निवेदन 



सांगोला/प्रतिनिधी :सांगोला शहरामध्ये नगरपरिषदेकडून गाळ्यांच्या भाड्यांची सक्तीची वसुली सुरू असल्यामुळे सदरचे गाळा भाडे भरण्याकरिता मुदत व सवलत मिळण्याकरिता व्यापारी असोसिएशन सांगोला यांच्या वतीने काल मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.



या निवेदनामध्ये व्यापारी यांनी त्यांचे मुद्दे नमूद केले आहेत. यामध्ये प्रामुख्याने कोरोना कालावधीमध्ये दोन वर्षे व्यवसाय बंद होते. परंतु इतर खर्च हा सुरूच होता. त्यामुळे व्यापारी वर्ग खचला आहे. तसेच नगरपरिषदेने वेळोवेळी घातलेल्या निर्बंधास व्यापाऱ्यांनी नेहमी सहकार्यच केले आहे. तरी आता मनोधैर्य खचलेल्या व्यापाऱ्यांवर सक्तीने गाळाभाडे वसुली न करता त्यांना गाळाभाडे मध्ये सवलत व मुदतवाढ मिळावी, अशा आशयाचे निवेदन व्यापारी असोसिएशनच्या वतीने देण्यात आले.



यावेळी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष माजी नगरसेवक सोमनाथ गुळमिरे, सचिव संजय गव्हाणे, माजी उपनगराध्यक्ष सुरेशआप्पा माळी, आशपान शेख, अजितकुमार गावडे, राजकुमार दौंडे, श्रीशैल्य घोंगडे, शंकर काळे, संतोष लाटणे, नागएश जाधव आदी उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments