google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 बलात्कार पीडितेबरोबर विवाह केल्याने फिर्याद रद्द करण्याचे आदेश

Breaking News

बलात्कार पीडितेबरोबर विवाह केल्याने फिर्याद रद्द करण्याचे आदेश

 बलात्कार पीडितेबरोबर विवाह केल्याने फिर्याद रद्द करण्याचे आदेश


बलात्कार केलेल्या पीडितेशी विवाह केल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने आरोपीविरुद्ध दाखल केलेली फौजदारी फिर्याद रद्दबातल करण्याचा आदेश दिला आहे. रायगड जिल्ह्यातील आरोपीविरुद्ध तक्रारदार तरुणीने (वय २५) जानेवारी २०२० मध्ये वडाळा टीटी येथे 



बलात्काराची फिर्याद नोंदवली होती; मात्र तक्रार दाखल केल्यानंतर दोन महिन्यांनी त्यांनी सहमतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला.लग्नानंतर आरोपीने उच्च न्यायालयात फिर्याद रद्द करण्याची मागणी याचिकेद्वारे केली होती.



आरोपीला मार्चमध्ये न्यायालयात जामीन मंजूर झाला होता. त्यानंतर त्यांनी लग्न केले. लग्नाच्या भूलथापा देऊन तरुणीवर जून २०१९ ते जानेवारी २०२० पर्यंत शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप पीडितेने केला होता. न्या. प्रसन्न वार्ले आणि न्या. अनिल किलोर यांच्या खंडपीठापुढे यावर सुनावणी झाली. आरोपीविरुद्ध माझी तक्रार नाही आणि आम्ही लग्न केले आहे, 



त्यामुळे फिर्याद रद्द करावी, असे मुलीच्या वतीने खंडपीठाला सांगण्यात आले. न्यायालयाने याबाबत सहमती दिली. अशा परिस्थितीत फिर्याद कायम ठेवणे अप्रस्तुत ठरेल. आरोपी आणि तक्रारदार सहमतीने एकमेकांशी शारीरिक संबंध ठेवून होते, त्यामुळे तक्रारीत तथ्य नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

Post a Comment

0 Comments