google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 क्रूरतेचा कळस ! मृत्यूनंतरही नराधम पीडितेवर करत होते बलात्कार

Breaking News

क्रूरतेचा कळस ! मृत्यूनंतरही नराधम पीडितेवर करत होते बलात्कार

 क्रूरतेचा कळस ! मृत्यूनंतरही नराधम पीडितेवर करत होते बलात्कार


नराधम मृत्यूनंतरही अल्पवयीन मुलीवर बलात्कार करत असल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. तीन नराधमांनी मुलीचं अपहर करून तिच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार  केला. त्यानंतर तिची हत्या केली आहे. २३ डिसेंबरला झाली होती बेपत्ता -आता तिच्या शवविच्छेदन अहवालावरून धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.



पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २३ डिसेंबरला राजस्थानमधील बुंदी येथील १५ वर्षीय मुलगी शेळ्या चारण्यासाठी जंगलात गेली होती. त्यावेळी एका आरोपीने तिचे अपहरण केले. त्यानंतर मित्रांसोबत मिळून तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. यावेळी आरोपी मद्यधुंद अवस्थेत होते. 



मुलीने प्रतिकार केला असता तिची दुपट्ट्याने गळा आवळून हत्या केली. तसेच दगडाने तिचं डोक ठेचलं.    विवस्त्र अवस्थेत आढळला मृतदेह --दुसरीकडे मुलगी घरी आली नसल्यानं कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला. मात्र, ती कुठेही दिसली नाही. शेवटी कुटुंबीयांनी पोलिसांमध्ये तक्रार केली.



 त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह जंगलात विविस्त्र अवस्थेत आढळून आला. यावेळी तिच्या मानेवर आणि गुप्तांगावर जखमा आढळून आल्या होत्या. पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केली असता त्याने बलात्काराची कबुली दिली. तसेच मित्रांसोबत मिळून हे कृत्य केल्यांचं पोलिसांना सांगितलं.गुप्तांगावर ३० हून अधिक जखमा -



मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. आता शविच्छेदनाचा अहवाला समोर आला असून त्यामध्ये धक्कादायक बाबी उघडकीस आल्या आहेत. अहवालानुसार, आरोपीने मुलीवर बलात्कार करण्यापूर्वी तिला तिच्या दुपट्टायने बांधले होते. तसेच तिच्या गुप्तांगावर ३० हून अधिक जखमा केल्या होत्या. 



आरोपीने संपूर्ण शरीरावर देखील जखमी केल्या होत्या. तसेच आरोपी मृत्यूनंतरही तिच्यावर बलात्कार करत होते. ही घटना अत्यंत क्रूर असून आरोपीचा खटला लढण्यासाठी बुंदी बार असोसिएशनच्या वकिलांनी नकार दिला आहे. तसेच मी माझ्या आयुष्यात इतकी क्रूर घटना कधी पाहिली नाही, अशी प्रतिक्रिया बुंदीचे पोलिस अधीक्षक जय यादव म्हणाले.

Post a Comment

0 Comments