google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 आणि म्हणून न्यायालयाने सुनावली तिला फाशीची शिक्षा !

Breaking News

आणि म्हणून न्यायालयाने सुनावली तिला फाशीची शिक्षा !

 आणि म्हणून न्यायालयाने सुनावली तिला फाशीची शिक्षा !


 सोशल मीडिया सामान्य माणसांच्या हाती आला असून प्रत्येकजण आपल्या मर्जीने या मीडियावर वक्त होत आहे पण याच माध्यमातून देवदेवतांची निंदा केली म्हणून एका महिलेला न्यायाल्यानाने थेट फाशीची शिक्षा सुनावली आहे. 


सोशल मीडिया अत्यंत उपयोगाचा आहे पण अनेक जण केवळ दुरुपयोग करण्यासाठी या चांगल्या माध्यमाचा वापर करीत आहेत. नियम, कायदे, नैतिकता अशा कशाचाही विचार न करता अनेकजण या माध्यमावर व्यक्त होत असतात तसे समाजाचे नुकसान करण्याचे कामही या माध्यमाच्या माध्यमातून केले जात असल्याचे आपणास अनेकदा पाहायला मिळते. 


पाकिस्तान येथे मात्र एका महिलेला अशा वागण्याची जबरदस्त किमत मोजावी लागली असून पाकिस्तानी न्यायालयाने या महिलेला थेट फाशी देण्याची शिक्षा सुनावली आहे. या महिलेने देवतांची निंदा करणारी पोस्ट व्हॉटस ऍप वरून लिहिली होती. काही धर्म, धर्माचे संस्थापक यांच्याबद्धल वादग्रस्त संदेश लिहिले होते आणि त्याची मोठी किंमत तिला मोजावी लागली आहे. 


व्हाट्स ऍपवरून तिने देवाची निंदा केली होती आणि हेच प्रकरण तिच्या अंगाशी आलं आहे. आपल्या धर्माचे संस्थापक यांच्याविरोधात व्हॉटस ऍप वर तिने काही मेसेज लिहिले आणि ते व्हायरल केले त्यामुळे तिच्याविरोधात कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली होती. 


या प्रकाराबाबत तिला अटक करण्यात आली आणि न्यायालयाने तिच्या या कृतीवर तीव्र नाराजी व्यक्त करीत तिला फाशीची शिक्षा सुनावली आहे. समाजमाध्यमावर देखील तिच्यावर खूप टीका झाली आणि नेटकऱ्यानी तिला जबरदस्त ट्रॉल केलं. तिच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी समाज माध्यमावर देखील होत राहिली होती.  


कट्टर धर्मवादी असलेल्या पाकिस्तानमध्ये अशा प्रकारे कट्टरता अमलात आणली गेली असल्याचे दिसून आले. पाकिस्तानात यापूर्वीही देवाची निंदा केल्याची काही प्रकरणे समोर आली होती. पाकिस्तान हा कट्टर धर्माचा पुरस्कर्ता आहे पण तिथल्या कायद्यावरही धर्माचा केवढा पगडा आहे हेच या घटनेतून समोर आले आहे. 


पाकिस्तानी वृत्तपत्र 'डॉन' ने दिलेल्या वृत्तानुसार हा निर्णय फारूक हसनात यांनी केलेल्या याचिकेवर दिला आहे. देवाची निंदा करणे , धर्माविषयी वादग्रस्त लेखन करणे आणि सायबर कायद्याचे उललंघन करणे असे तीन आरोप तिच्यावर ठेवण्यात आले होते. या आरोपावरून न्यायालयाने या महिलेला फाशीची शिक्षा सुनावली आहे.

Post a Comment

0 Comments