google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 संतापजनक ! मुंबईत तरुणीवर सामूहिक बलात्कार ; कामावरून घरी जात होती

Breaking News

संतापजनक ! मुंबईत तरुणीवर सामूहिक बलात्कार ; कामावरून घरी जात होती

 संतापजनक ! मुंबईत तरुणीवर सामूहिक बलात्कार ; कामावरून घरी जात होती


मुंबई : कामावरून घरी परतणाऱ्या तरुणीवर चार नराधमांनी बलात्कार केल्याची घटना मुंबईत घडली असून या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केलीये. तर आणखी दोन आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.मुंबईतील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून या घटनेवर सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. 


शिवाजीनगर परिसरात राहणारी १९ वर्षांची तरुणी केटरिंगचे काम करते. शनिवारी पहाटे साडे चारच्या सुमारास पीडित तरुणी कामावरुन घरी परतत होती. शिवाजीनगर येथील जुन्या बस डेपोजवळून जात असताना तरुणीला चार जणांच्या टोळक्याने गाठले. यातील एक आरोपी पीडित तरुणीच्या ओळखीचा होता. 'ऐवढ्या रात्री तू कुठून येतेस?', असं विचारत नराधमांनी त्या तरुणीला थांबवले.


केटरिंगचे काम संपवून घरी जात असल्याचे तिने सांगितले असता ओळखीच्या तरुणाने पीडितेला महत्त्वाचे बोलायचे आहे, असे सांगत रस्त्याच्या कडेला नेले. तिथून पीडितेला ओढत झोपडीत नेले. त्यानंतर उर्वरित तिघे आरोपीही झोपडीत गेले. या चौघांनी पीडितेवर सामूहिक बलात्कार केला. पीडितेने ओरडण्याचा प्रयत्न केला असता नराधमांनी तिचे तोंड दाबले.



बलात्कारानंतर नराधमांनी घटनास्थळावरून पळ काढला. शेवटी पीडितेने कसेबसे पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरूवात केली. दुसरीकडे चार पैकी दोन आरोपी उत्तर प्रदेशला पळून जाण्याच्या तयारीत होते. मात्र, तोवर मुंबई पोलिसांच्या पथकाने डोंगरी परिसरातून त्यांना अटक केली. या घटनेतील अन्य दोन आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments