सांगोला तालुक्यात कडाक्याच्या थंडीचा फायदा घेत चोरांच्या टोळ्या सक्रिय
महूद परिसरात चोऱ्यांचे सत्र सुरू
सांगोला / प्रतिनिधी गेल्या काही दिवसांपासून तालुक्यांमध्ये थंडीच्या प्रमाणामध्ये वाढ झाली असल्याने तालुक्यामध्ये चोरट्यांच्या टोळ्या सक्रिय झाल्या असून तालुक्यामध्ये छोट्या-मोठ्या चोऱ्यांचे सत्र सुरू झाले आहे.
गेल्या दोन दिवसा पाठीमागे महूद परिसरात एक मोटार रिवाइंडिंग चे दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडले होते या घटनेचा तपास सुरू असतानाच आज पहाटे च्या दरम्यान लक्ष्मीनगर येथील दोन किराणामालाची दुकाने, एक हाॅटेल व एक घर फोडल्याची घटना समोर आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की लक्ष्मीनगर येथील आचकदाणी महुद रोड वरील बाड वस्ती येथे रवी बाड यांचे वैष्णवी टायर वर्क अॅड किराणा स्टोअर नावाचे दुकान आहे व तिथून काही अंतरावर गिरीधर गुजरे यांचे वृंदा फूड मार्ट अँड जनरल स्टोअर नावाचे दुकान आहे.
आज पहाटे ३ ते ४ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी या दोन्ही दुकानाच्या पाठीमागील पत्रा कटरने कट करून आत प्रवेश करत एका दुकानांमधील रोख रक्कम ४ हजार ५०० रुपये व दुसऱ्या दुकानांमधील रोख रक्कम अाठशे रुपये तसेच दोन्ही दुकानातील किराणामाल चोरून तेथून पोबारा केला.
तसेच राहुल मोरे यांचे हॉटेल तात्याचा ढाबा व कृष्ण गळवे यांचे घर फोडले आहे. याबाबत रवी बाड, गिरधर गुजरे, हॉटेल मालक राहुल मोरे व कृष्णा गळवे यांनी लक्ष्मी नगर चे पोलीस पाटील सोमनाथ नरळे यांना माहिती दिली असता त्यांनी
सदरची माहिती सांगोला पोलीस स्टेशनला कळवली. सांगोला पोलीस स्टेशन कडील पोलीस हेडकॉन्स्टेबल झोळ व होमगार्ड सागर इंगोले यांनी घटनास्थळी भेट दिली असून पुढील तपास सांगोला पोलीस करत आहेत.

0 Comments