सगळ्यांत श्रीमंत पक्ष भाजप ! किती आहेत पक्षाकडे पैसे? इतर पक्षांकडे किती संपत्ती?
पहा रिपोर्टमधून समोर आलेली आकडेवारी - सध्या भाजप हा पक्ष मागील सात वर्षांपासून केंद्रात सत्तेत आहे. त्याचप्रमाणे अनेक राज्यांत देखील भाजपने सत्ता स्थापलेली आहे.
दरम्यान आता एका अहवालानुसार पक्षांच्या संपत्तीचा आकडा समोर आला आहे. २०१९-२० या वर्षातील भाजपची घोषित संपत्ती ४ हजार ८४७ कोटी आहे.
दरम्यान इतर पक्षातील संपत्तीचा आकडा देखील समोर आला आहे. संपत्तीच्या बाबतीत दुसऱ्या स्थानी मायावती यांच्या बहुजन समाज पक्ष आला आहे.
बहुजन समाज पक्ष ६९८.३३ कोटींचा धनी आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) यांनी राजकीय पक्षांच्या घोषित संपत्तीचा तपशील प्रसिद्ध केला आहे. प्रादेशिक पक्षांचा जर विचार केला तर समाजवादी पक्ष अर्थात सपाकडे ५६३.४७ कोटी इतकी घोषित संपत्ती आहे.
त्यानंतर तेलंगण राष्ट्र समितीची (टीआरएस) घोषित संपत्ती ३०१.४७ कोटी तर अण्णा द्रमुकची घोषित संपत्ती २६७.६१ कोटी इतकी आहे. एकूण घोषित संपत्तीचा विचार केल्यास सात राष्ट्रीय पक्षांनी जाहीर केलेल्या संपत्तीचा आकडा ६,९८८.५७ कोटी रुपये इतका आहे
तर प्रादेशिक पक्षांची एकूण घोषित संपत्ती २,१२९.३८ कोटी रुपये इतकी आहे. मुदत ठेवींचा विचार केल्यास तिथेही भाजपचा आकडा सर्वात जास्त आहे.
भाजपचे मुदत ठेवींमध्ये ३ हजार २५३ कोटी रुपये जमा आहेत . प्रादेशिक पक्षांचा विचार केल्यास समाजवादी पार्टी – ४३४.२१९ कोटी, टीआरएस – २५६.०१ कोटी,
अण्णा द्रमुक – २४६.९० कोटी, द्रमुक – १६२.४२५ कोटी, शिवसेना – १४८.४६ कोटी, बिजू जनता दल – ११८.४२५ कोटी अशी रक्कम मुदत ठेवींमध्ये आहे.

0 Comments