सामाजिक बांधिलकी जपत सीबीएस न्युजच्या वतीने महाराष्ट्रात विविध ठिकाणी विविध उपक्रम
वास्ताविक स्वार्थ व वैयक्तिक हितासाठी झगडणाऱ्या आजच्या दुनियेत सामाजिक बांधिलकी व माणुसकी लोप पावत चालली आहे. प्रत्येक जण इथे फक्त स्वतःपुरताच विचार करतो. यामुळे गरीब श्रीमंत दरी समाजात वाढत चालली आहे. ही दरी कमी करायची असेल समाजातील गरीब, दुर्बल व वंचित घटकांचा विचार कुणीतरी करायला हवा हाच विचार डोक्यात घेऊन
निर्भीड पत्रकार व सीबीएस न्युज मराठी संपादक चाँदभैय्या शेख हे आतापर्यंत समाजाच्या उन्नतीसाठी रात्रीचा दिवस करीत आहेत .परवा पत्रकारिता जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती चे औचित्य साधून महाराष्ट्रात विविध ठिकाणी प्रतिनिधी माध्यमातून विविध उपक्रम राबविले आहे .
आपल्या संस्कृतीत मातापिता गुरुजन मायभूमी यांच्याप्रमाणे समाजाचेही ऋण मानले जाते त्यामुळे प्रत्येकाने समाजातील गरजू व्यला यथाशक्ती मदत करावी अशी शिकवण आपली संस्कृती देते याच प्रमाणे समाजातील काही संस्था व्यक्ती या दृष्टी जागरूक पणे कार्य करीत असतात
आणि सामाजिक बांधिलकी जोपसण्याचा प्रयत्न करीत असतात अशाच प्रकारे सीबीएस न्युज मराठी डिजिटल नेटवर्क व मुख्य संपादक चाँदभैय्या शेख हे आहेत .परवा पत्रकार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गोरगरीब ,वंचित समाजाला अन्नधान्य ,शालेय साहित्य वाटप केले आहे .
सोलापूर जिल्हा ,नाशिक जिल्हा ,पुणे जिल्हा ,सांगली जिल्हा ,कोल्हापूर जिल्हा ,सातारा जिल्हा सह इतर जिल्ह्यात हि अनेक ठिकाणी सामाजिक बांधिलकी जपत जिल्ह्यातील जिल्हा प्रतिनिधी ,तालुका प्रतिनिधी ने त्यांच्या स्थरावर हे कार्यक्रम आयोजित केले होते .सीबीएस न्युज मराठी ने हा अनोख्या उपक्रम हाती घेतल्याने एक वेगळा आदर्श निर्माण झाला आहे .कोणाला हि वाटते एखादे चांगले काम केल्यावर यशस्वी व्यक्तींची शाबासकीची थाप पाठीवर मिळावी ती शाबासकीची थापा देणाऱे सीबीएस न्युज मराठी आहे .
हुशार पण आर्थिकदृष्ट्या गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदतीचा हात देणारे सीबीएस न्युज मराठी .गोरगरीब दु:खी पिडित व आर्थिक दुर्बल घटकातील पिसलेल्या लोकांच्या जवळ जावून त्यांच्या व्यथा जाणून त्यांना जगण्याची झगडण्याची व यातून सावरण्याची इच्छाशक्ती निर्माण करणारे
सीबीएस न्युजचे संपादक चाँदभैय्या शेख आहेत .चंदनासारखा आनंद ते सर्वांना वाटत आले आहेत .यामुळे या आनंदाचा सुगंध स्वतः बरोबर दुसऱ्यांना देण्येचे काम करीत आहेत .विशेषतः या विशेष कार्यक्रमात सर्व प्रतिनिधी ,संपादक मंडळ , सर्व निवेदिका यांचा विशेष सहकार्य लाभत आहे

0 Comments