google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर जिल्ह्यातील शासकीय कार्यालयात आता प्रतिज्ञापत्रासाठी स्टॅम्प पेपरची आवश्यक नसणार

Breaking News

सोलापूर जिल्ह्यातील शासकीय कार्यालयात आता प्रतिज्ञापत्रासाठी स्टॅम्प पेपरची आवश्यक नसणार

 सोलापूर जिल्ह्यातील शासकीय कार्यालयात आता प्रतिज्ञापत्रासाठी स्टॅम्प पेपरची आवश्यक नसणार


विविध प्रकारच्या दाखल्यासाठी तसेच कामकाजासाठी शासकीय कार्यालये व न्यायालयासमोर करावयाच्या प्रतिज्ञापत्रासाठी स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र देण्याची आवश्यकता नाही, असे निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी सांगितले.


उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये तसेच राज्य शासनाने २००४ मध्ये शासकीय कार्यालयात प्रतिज्ञापत्रासाठी मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.


विविध प्रकारचे दाखले घेण्यासाठी शासकीय कार्यालय व न्यायालयासमोर करावयाच्या प्रतिज्ञापत्रासाठी स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र सादर करण्याची आवश्यकता नाही.


शासकीय कार्यालयात प्रतिज्ञापत्र सादर करताना नागरिकांकडून मुद्रांक शुल्काची मागणी करू नये, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी पवार यांनी दिले आहेत.

Post a Comment

0 Comments