google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 तिप्पेहळ्ळी (ता.सांगोला) गावचे सुपुत्र अजय अर्जुन नरळे यांची मुख्याधिकारी पदी निवड !

Breaking News

तिप्पेहळ्ळी (ता.सांगोला) गावचे सुपुत्र अजय अर्जुन नरळे यांची मुख्याधिकारी पदी निवड !

 तिप्पेहळ्ळी (ता.सांगोला) गावचे सुपुत्र अजय अर्जुन नरळे यांची मुख्याधिकारी पदी निवड !



सांगोला तालुक्यातील तिप्पेहळ्ळी गावचे सुपुत्र , सध्या मंगळवेढा नगरपालिकेत कार्यरत असलेले पाणीपुरवठा अभियंता मा.श्री.अजय अर्जुन नरळे यांची नगरविकास विभाग खात्या अंतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षेतून पहिल्याच प्रयत्नात मुख्याधिकारी पदी निवड झाली आहे.


त्यांनी आजवर वेगवेगळ्या ठिकाणी पाणीपुरवठा विभागासोबत विद्युत विभाग , अग्निशमन विभाग व वृक्षपाधिकरण विभागात कामकाज होते . अजय नरळे हे जुलै २०१८ पासून मंगळवेढा नगरपालिका येथे रुजू होऊन कामकाज पाहत आहेत , त्यापूर्वी त्यांनी सांगोला नगरपालिका (सोलापूर) व कोपरगाव नगरपालिका (अहमदनगर) येथे २०१३ ते २०१८ पर्यंत पाणीपुरवठा अभियंता म्हणून कामकाज पाहिले आहे . 


ते मूळचे सांगोला तालुक्यातील तिप्पेहळ्ळी गावचे रहिवाही आहेत . त्यांनी सन २०११ मध्ये डॉ . बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणारे , जिल्हा रायगड येथून अभियांत्रिकी पदवी घेतली आहे . मंगळवेढा येथे काम करताना त्यांनी शहराला तसेच शहरालगतच्या दोन्ही ग्रामपंचायत संत चोखामेळा नगर व संत दामाजी नगर येथे कोणतीही तक्रार न येवू देता दुष्काळ परिस्थिती असताना ही व्यवस्थित रीत्या पाणीपुरवठा करून आपले कर्तव्य पार पाडले , जलशुद्धीकरण केंद्र , स्मशाभूमीत व शहरामध्ये तसेच इतर विविध ठिकाणी झाडे लावली . 


स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत विविध कामे पार पाडली . उचेठाण जॅकवेल येथे संरक्षक भिंत बांधनेचे काम पूर्ण केले . अतिशय शांत , संयमी , स्वभाव व सोबत काम करणारे कर्मचारी यांच्याशी मिळून राहणे असा त्यांचा स्वभाव आहे . नगरविकास विभागाकडे यापूर्वी ८ वर्षे अभियंता म्हणून सेवा केल्याने त्यांना मुख्याधिकारी म्हणून सेवा करताना पूर्वीच्या कामाच्या अनुभवाचा फायदा होणार आहे.त्यांच्या यशाबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे .

Post a Comment

0 Comments