30 कोटी रुपये निधीचा कामाचा आ.शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते शुभारंभ
सांगोला:-सांगोला तालुक्याचे कार्यसम्राट व पाणीदार आमदार म्हणून सर्वांना परिचित असणारे शहाजी बापू पाटील यांनी आमदार झाल्यापासून सांगोला तालुक्यातील विकास कामांना गती देऊन विकास कामे पूर्ण करण्याचा संकल्प केला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी आ. शहाजीबापू पाटील व महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील व काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रा. प्रबुद्धचंद्र झपके
यांनी सांगोला तालुक्यातील विविध ठिकाणची तीस कोटी रुपये रस्त्यांचे भूमिपूजन केले होते. यापैकी जवळा ते घेरडी रोडचे काम अखेर सुरू झाले असून 30 कोटी रुपये निधीचा शुभारंभ झाला म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
सांगोला शहर व सांगोला तालुक्यांमध्ये आमदार शहाजीबापू पाटील यांनी गेल्या दोन वर्षांमध्ये 240 कोटी रुपये इतका निधी तालुक्यामध्ये आणून, रोडची कामे,वेगवेगळे शासकीय इमारतींचा निधी, ग्रामपंचायत स्तरावरील सर्व निधी, असा वेगवेगळ्या स्वरूपाचा निधी आणून आमदार पाटील यांनी जनतेच्या मनामध्ये आपल्याबद्दल एक वेगळाच ठसा उमटवून काम केल आहे.
तसेच तालुक्याच्या विकासकामांसाठी अजून एक हजार कोटी रुपये सरकारकडे प्रस्तावित स्वरूपात आहेत. व याचा सतत पाठपुरावा करत असल्याने हा निधी लवकरात लवकर तालुक्याला मिळवून राहिलेली सर्व विकास कामे पूर्ण करण्याचा संकल्प असल्याचेही आमदार शहाजीबापू पाटील यांनी दोन दिवसापूर्वी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये उल्लेख केला आहे.
यामुळे भविष्यकाळात आ.पाटिल यांच्या माध्यमातून सांगोला तालुक्यांमध्ये विकास कामांचा कायापालट नक्कीच होणार आहे. यामुळे नागरिकांमध्ये सुद्धा उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. तालुक्यामध्ये रस्ते कामांना सुरुवात झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
0 Comments