google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पुष्पा सिनेमा पाहून 3 अल्पवयीन मुलांनी केली एकाची हत्या

Breaking News

पुष्पा सिनेमा पाहून 3 अल्पवयीन मुलांनी केली एकाची हत्या

 पुष्पा सिनेमा पाहून 3 अल्पवयीन मुलांनी केली एकाची हत्या


आयकॉन स्टार अल्लू अर्जुनचा पुष्पा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आणि ओटीटीवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे . पण , त्या चित्रपटातील गुन्हेगारीने प्रेरीत होऊन तिघा अल्पवयीन मुलांनी एका व्यक्तीचा पोटात चाकू खुपसून हत्या केली आहे .


 गुन्हेगारीविश्वात नाव कमविण्यासाठी हे कृत्य केलं असल्याचं त्या मुलांनी सांगितलं आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , दिल्लीच्या जहांगीरपुरी परिसरात या तीन अल्पवयीन मुलांनी ही हत्या केली आहे . अल्लू अर्जुनच्या पुष्पा चित्रपटात दाखविलेल्या गुन्हेगारीने ते प्रेरीत होते . 


या मुलांना गुन्हेविश्वास प्रसिद्ध व्हायचं होते आणि वर्चस्व निर्माण करायचं होतं . ही हत्या केल्यानंतर त्याचा व्हिडिओदेखील तयार केलेला होता . या व्हिडिओ ते इन्स्टाग्रामवर अपलोड करणार होत एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले की , “ जहांगीरपुरी पोलीस ठाण्यात बुधवारी बाबू जगजीवन राम स्मारक रुग्णालयातून माहिती मिळाली की , एका व्यक्तीच्या पोटात घुसविण्यात आला आहे .


 पण , त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे . तपासात कळलं की , मृत व्यक्तीचं नाव शिबू ( वय -२४ ) आणि तो जहांगीरपुरीचा रहिवाशी होता . "पोलीस उपायुक्त उषा रंगनानी म्हणाल्या की , “ या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज हाती लागले आहे . त्यात मृत व्यक्तीची आणि त्या तीन अल्पवयीन मुलींची भांडणं झाली होती .


 त्यातून त्यांनी संबंधित व्यक्तीची हत्या केली आहे . सध्या तीन आरोपी मुलांना ताब्यात घेण्यात आले आहेत . ' पुष्पा ' चित्रपट आणि ‘ भौकाल ’ वेबसीरिज पाहून त्यांनी हे कृत्य केल्याचं आरोपी मुलांनी पोलिसांनी सांगितलं आहे . ”

Post a Comment

0 Comments